ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तेजपत्ता तसेच दालचिनीमध्ये अँटिऑक्सडंट्स ,अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल असे अनेक गुणधर्म असतात.
यामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे याचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे शरीरासाठी आहेत.
याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते तसचे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
तेजपत्ता आणि दालचिनीचा चहा दररोज नियमित प्यायल्याने इन्सुलिन प्रतिरोध क्षमता सुधारते.
सध्या बदलत्या वातावरणांमुळे अनेक संसर्गाचा त्रास सहज होतो अशावेळे या दोघांचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
तेजपत्ता आणि दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
शरीरातील कोलोस्ट्रॉल नियंत्रित ठवण्यासाठी तेजपत्ता आणि दालचिनीचे पाणी मदत करते.
थंडीच्या दिवसात सर्दी झाल्यास तेजपत्ता आणि दालचिनीचा चहा सेवन करावा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.