ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी सगळेच वाटाण्याच्या शेंगा सोल्यानंतर वाटाण्याच्या साली फेकून देतो.
पंरतु तुम्हाला त्याचे उपयोग माहिती आहेत का?
वाटाण्याच्या सालींमध्ये अनेक पोषक घटक असतात,जे झाडांनाही पोषक देण्याचे काम करतात.
एका भांड्यात वाटाण्याची साले बारीक करुन ठेवा. त्यात थोडी माती तसेच खत मिसळा. हे भांडे काही दिवस झाकून ठेवा काही दिवसात तुमचे खत तयार होईल.
या सालींपासून खूप चवदार चटणी तयार करता येते.
वाटाण्याच्या साली आधी पाण्यात उकळा.त्यात आले,धणे, कांदा, काळे तीळ तसेच लसूण टाका. सर्व पदार्थ बारीक करुन घ्या.
वाटाण्याच्या साली बारीक करुन त्यात मध आणि हळद , चंदन पावडर मिसळल्यानंतर चांगेल असे फेस पॅक तयार होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.