Diabetes risk Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

ICMR Study News : समोसा,भजी, वेफर्स खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आयसीएमआरच्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

नवी दिल्ली : तुम्ही विचार करत असाल की, जास्त गोड खाल्ल्याने मधूमेह होतो, तर तुम्ही मोठ्या गैरसमजात आहात. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशनच्या अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. या अहवालात तळलेले पदार्थ, पॅकेट बंद पदार्थाचे अधिक सेवन करणाऱ्या भारतीयांमध्ये मधूमेहाचा धोका वाढू लागल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅडवान्स ग्लाइकेशन अँड प्रॉडक्ट्स ( केक, वेफर, कुकीज, क्रॅकर, तळलेले पदार्थ, मियोनिज आणि पॅकेट बंद पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मधुमेहासारखा आजार होतो. यात विषारी द्रव्ये आढळतात. ते प्रोटीन आणि लिपिडचे ग्लायकेटिड अल्डोज शुगरमुळे तयार होतात. या पदार्थांचं सेवन दिर्घकाळ केल्याने शरीरावर सूज येण्याची शक्यता आहे. तर मधुमेह देखील होण्याची शक्यता आहे.

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची मोठी संख्या

भारतात इतर देशांच्या तुलनेत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 'द लँसेट'मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये भारतात १०१ मिलियन मधुमेहाचे रुग्ण होते. तर १३६ मिलियन रुग्ण हे प्री-डायबिटिक होते. त्यामुळे भारतीयांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, एजीई पदार्थांबरोबर आहारात फळ, भाज्या, कमी फॅट असणाऱ्या दूधाचा समावेश केल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. जास्त प्रमाणात साखर आणि मीठ असणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रोलची समस्या वाढण्याची शक्यता आहे.

लठ्ठपणा : साखर आणि मीठ अधिक असलेल्या पदार्थांमुळे भारतीय लोकांमध्ये लठ्ठपणाचा आजार वाढू लागला आहे. या लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदय विकार, फॅट लिव्हर, हाय कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांना निमंत्रण मिळतं.

इन्सुलिन रेझिस्टन्स - भारतीयांमध्ये इतर देशांच्या तुलनेत इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास अधिक आबे. शरीरात ग्लूकोजला नियंत्रित करण्यासाठी इंन्सुलिन निर्माण करू शकत नाही. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. शरीरातील साखरेचं प्रमाण वाढल्याने मधूमेहाचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT