Drinking Warm Water Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय आहे? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Shraddha Thik

Drinking Warm Water :

स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक दररोज दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिण्याने करतात. बहुतेक फिटनेस ट्रेनर आणि सेलिब्रिटी देखील या दिनचर्येने त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. असे काही लोक आहेत जे ही दिनचर्या योग्य मानत नाहीत. कोमट पाण्याचे (Warm Water) फायद्यांसोबतच तोटेही आहेत, जाणू घेऊयात.

तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. चला तर मग आरोग्य (Health) तज्ज्ञांकडून याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे डॉ. वरलक्ष्मी याबद्दल काय सांगतात पाहूयात.

पाणी पिण्याची पद्धत

अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी किंवा त्वचा चमकदार बनवण्यासाठी आपण पाणी पिण्याचे एक ध्येय ठरवतो. दिवसभर त्यांचा हा नित्यक्रम सुरू असतो. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले नाही. तहान लागल्यावरच पाणी प्यावे, असे वरलक्ष्मी सांगतात. पाणी प्यायल्यानंतर लगेचच कोणतेही पदार्थ खाऊ नका.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी यात शंका नाही. मात्र यासोबतच काही नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. नेहमी दात घासल्यानंतरच पाणी प्या. व्यायाम करण्यापूर्वी पाणी पिऊ नका. सकाळी नाश्त्यासोबत थोडे कोमट पाणी पिऊ शकता. तथापि, 100 मिली पेक्षा जास्त पाणी पिऊ नका.

या गोष्टींची काळजी घ्या

बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर 1 किंवा 2 ग्लास पाणी पितात. असे केल्याने पोट साफ होईल असा त्यांचा विश्वास असतो. पण त्याचा तोटा आहे की तुमच्या तोंडात रात्रभर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात. सकाळी तोंड स्वच्छ न करता हेच बॅक्टेरिया पोटात जातात. त्यामुळे अनेक समस्या वाढतात.अशा परिस्थितीत दात घासल्यानंतरच कोमट पाणी प्यावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : सावधान! आज पुन्हा कोसळणार परतीचा पाऊस; मुंबई पुण्यासह १४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Horoscope Today : सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश, मेष ते मीन राशीच्या नशिबात काय होणार बदल? वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या राशीभविष्य

Assembly Election: विधानसभेसाठी वंचितची रणनीती; प्रकाश आंबेडकरांच्या खेळीनं मविआत चलबिचल ?

Crime News: उधारीचे पैसै मागताच राग अनावर; उकळता चहाचा टोप मारला चेहऱ्यावर

SCROLL FOR NEXT