Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Health Tips : 'हे' काळे पदार्थ कॅल्शिअमचा मोठा खजिना आहेत; रोज सेवन केल्याने हाडांना मिळेल १० पट जास्त ताकद

Ruchika Jadhav

हाडांच्या मजबुतीसाठी प्रत्येक व्यक्तीने आहारात जास्त कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. दही, दूध, तूप आणि लोणी अशा पदार्थांमध्ये कॅल्शिअम जास्त असतं. मात्र काहींना याची चव आवडत नाही. त्यामुळे दही आणि दूध बऱ्याच व्यक्ती खात नाहीत. आता हे पदार्थ आहारात नसल्याने याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हाडे ठिसूळ होतात, शिवाय कॅल्शिअमच्या कमतरतेने अशा व्यक्ती जास्त अशक्त होतात.

त्यामुळे दूध आणि दूधापासून बनवलेले पदार्थ न खाणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही वेगळ्या पदार्थांची लिस्ट आणली आहे. हे पदार्थ काळे आहेत. मात्र पांढऱ्या दुधाच्या दुप्पट यात कॅल्शिअम आणि विविध जीवनसत्व आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या पदार्थांचे सेवन करू शकता आणि आपली हाडे लोखंडासारखी मजबूत करू शकता.

काळे तीळ

काळे तीळ म्हणजे कॅल्शिअम आणि आयर्नचा भला मोठा खजिना. तुम्ही आजपासूनच आहारात काळ्या तिळांचा समावेश केला पाहिजे. काळे तीळ विविध भाज्या, नूडल्स, भात तसेच सलाडमध्ये सुद्धा मिक्स करू शकता. काळे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतील तसेच शरीरावर असलेल्या गाठी सुद्धा दूर होतील.

काळी उडीद डाळ

उडीद डाळ दोन प्रकारच्या असतात. एक असते काळी उडीद डाळ आणि दुसरी याच डाळीची साल काढल्यावर तयार होते सफेद उडीद डाळ. दोन्ही डाळी आपल्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. जर तुमची हाडे ठिसूळ असतील तर तुम्ही आजपासूनच काळी उडीद डाळ खाण्यास सुरुवात केली पाहिजे. ही डाळ आपल्या शरिरात आयर्नची कमतरता दूर करते. तसेच कफ आणि सर्दी खोकल्यावरही काळी उडीद डाळीचे सूप जबरदस्त आहे.

काळे मनुके आणि चणे

तुम्ही आजवर द्राक्ष आणि साधे मनुके खाल्ले असतील मात्र आजपासूनच काळे मनुके खाण्यास सुरुवात करा. काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी बेस्ट आहेत. काळे मनुके आणि काळे चणे खाल्ल्याने लोह आणि कॅल्शिअमची कमतरता दूर होते. तुम्ही दूध पित नसाल तरी देखील काळे मनुके आणि चणे खाल्ल्याने तुम्हाला एक ग्लास दुधाइतकेच कॅल्शिअम मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: महायुतीच सरकार पूर्ण बहुमताने निवडून येईल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Mumbai Local Train : लोकलच्या गर्दीचा आणखी बळी! डोंबिवली-कोपरदरम्यान ITI च्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Maharashtra News Live Updates: 225 जागांवर आमचं एकमत झालं, जागावाटपावर प्रफुल पटेल यांचा दावा

Hiraman Khoskar : इगतपुरीत कॉंग्रेसला धक्का; हिरामन खोसकरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

Sambhaji Raje Chhatrapati : उमेदवार पाडण्यापेक्षा..; निवडणूक जाहीर होताच संभाजीराजेंचा जरांगेंना सल्ला

SCROLL FOR NEXT