Bones Health : लोखंडासारखी ताकत असेलेली हाडे बनवायचीयेत? आजपासूनच आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Strong Bones as Iron : दररोज ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. ज्या व्यक्तींची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत त्यांनी या ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश केला पाहिजे.
Strong Bones as Iron
Bones HealthSaam TV
Published On

आपलं संपूर्ण शरीर वेगवेगळ्या हडांमुळे उभं आहे. शरीरात हाडेच नसती तर आपल्याला आपण सध्या जितक्या हालचाली करत आहोत तितक्या करता आल्या नसत्या. त्यामुळे आपल्या आरोग्यासह आपण आपल्या हाडांची देखीस विशेष काळजी घेतली पाहिजे.

Strong Bones as Iron
Bone Health : तुमची हाडं कमकुवत करु शकतात 'या' सवयी, आताच जाणून घ्या

शरीरातील हाडं मजबूत असतील तर कोणतंही मेहनतीचं काम सहज करता येतं. मात्र हाडे कमजोर असतील तर रस्त्याने चालताना देखील हातात, पायात वेदना जाणवतात. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम, विटॅमीन, प्रोटीन जास्तप्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

हिरव्या पालेभाज्या

ब्रोकोली, पालक, मेथी, शेपू या सर्व हिरव्या पालेभाज्या अनेक व्यक्ती खात नाहीत. या भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. मात्र यामध्ये व्हिटॅमिन अ आणि क असते. त्यामुळे हडांच्या मजबुतीसाठी हिरव्या पालेभाज्या महत्वाच्या आहेत.

ड्रायफ्रूट्स

अकरोड, काजू, बदाम, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स चवीला छान असतात. तसेच याचे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि प्रोटीन मिळते. त्यामुळे दररोज ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. ज्या व्यक्तींची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत त्यांनी या ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश केला पाहिजे.

मासे

माशांमध्ये व्हिटॅमीन डी असते. तसेच फायबर आणि प्रोटीन देखील जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला हडांच्या काही समस्या असतील तर आहारात माशांचा समावेश करा. यासाठी तुम्ही समुद्रातील मासे किंवा गोड पाण्यातील मासे देखील खाऊ शकता.

डेअरी प्रोडक्ट

दूध आपल्या हडांना मजबूत बनवते हे तर सर्वांना माहितीच आहे. मात्र अनेक व्यक्ती दूध पिण्यास कंटाळा करतात किंवा त्यांना याची चव आवडत नाही. त्यामुळे दूधाचे सेवन करत नसाल तर दूधापासून बनलेल्या अन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्याने देखील तुमची हाडे मजबूत होतील.

Strong Bones as Iron
Fish Bone Stuck in Throat: घशात मच्छीचा काटा अडकला आहे का? करा 'हे' सोपे उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com