लाईफस्टाईल

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळे देशात 20 मिनिटाला एक बळी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Sandeep Chavan

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. ही बातमी पाहा आणि सावध व्हा.कारण, मेंदूवर जास्त ताण येतोय.यामुळे तासाला 4 जणांचा मृत्यू ब्रेन स्ट्रोकने होत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

मेंदूला सांभाळा. होय, असं आम्ही का म्हणतोय ते तुम्हाला ही बातमी पूर्ण पाहिल्यानंतर कळेल. देशात ब्रेन स्ट्रोकचे एवढे रुग्ण वाढलेयत की तासाला 4 जणांचा मृत्यू होतोय. हा दावा ऐकून अनेकांना धक्काच बसलाय.त्यामुळे खरंच या दाव्यात तथ्य आहे का? ब्रेन स्ट्रोकमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव का जातोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

व्हायरल मेसेज

बदलत्या जीवनशैलीमुळे ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत चाललंय. देशात प्रत्येक वर्षी 18 लाख नवे रुग्ण ब्रेन स्ट्रोकचे आढळतायत. 30 टक्के रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतोय.

हा दावा धक्कादायक असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने अधिक रिसर्च केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण का वाढलेयत? याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य आणि साम इन्व्हिस्टिगेशन

इंडियन स्ट्रोक असोसिएशनने ही माहिती दिलीय.

हृदयरोग, किडनी विकार, कॅन्सर रुग्णांपाठोपाठ देशात ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण अधिक.

देशात प्रत्येक वर्षी 18 लाख नवे रुग्ण ब्रेन स्ट्रोकचे आढळून येत आहेत.

30 टक्के रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू.

प्रत्येक तासात चार जणांना आपला जीव गमवावा लागतोय.

दिवसभरात सुमारे 96 जणांचा ब्रेन स्ट्रोकमुळे बळी जातो.

हृदयविकाराची लक्षणं लवकर दिसतात. त्यामुळे रुग्ण काळजी घेतो. त्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचे लक्षण लवकर दिसून येत नाही. काहीच दुखत नसल्यामुळे नागरिक आवश्यक ती काळजी घेत नाहीत आणि तिथेच घात होतो. त्यामुळे आम्ही तज्ज्ञांकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

काय काळजी घ्यावी?

ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करावी

चार महिन्यांतून एकदा तपासणी करून घ्या.

बीपी, शुगरची औषधे सुरू असतील तर नियमित घ्या.

फास्टफूड आणि तेलकट खाणे टाळा.

वेळेत उपचार होत नसल्याने देशात वर्षाला 5 लाख जणांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू होतो, असं इंडियन स्ट्रोक असोसिएशनने म्हटलंय. त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या...घरीच उपचार करून वेळ घालवू नका. आमच्या पडताळणीत ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : हिट अँड रनच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं; अलिशान कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Pune Crime: दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार, जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पुण्यातील घटना

EPFO News: EPFO चा मोठा निर्णय! पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही कळणार एका मेसेजवर

Ahilyanagar News : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, अहिल्यानगरमध्ये दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Jalgaon Crime: धान्य व्यापाऱ्याच्या पत्नीची निर्घृण हत्या; जळगाव हादरलं

SCROLL FOR NEXT