Sakshi Sunil Jadhav
अनेक जण म्हाडाचं घर विकत घेतात. मात्र त्यांना घर विकण्याबाबतचे महत्वाचे नियम माहित नसतात.
म्हाडाच्या घरांची घरे प्रामुख्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मिळकत व्यवस्थापन, विक्री विनियम १९८१ अंतर्गत येतात.
तुम्ही घरांचे हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सुद्धा अडकू शकता.
वरळी बीडीडीमध्ये घरांचा पुनर्विकासानंतर १३ ऑगस्टला राज्य सरकारने ५५६ सदनिकांच्या चाव्या प्रदान केल्या आहेत.
त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना मिळालेली सोन्यासारखी घरं कोणीही विकू नयेत. असे आवाहन केले.
कारण सांगायचे झाले तर, मोठी किंमत मिळत असल्याने किंवा कौटुंबिक वादामुळे लोक घरं विकतात.
मात्र म्हाडाच्या घरांच्या विक्रीसंदर्भातील नियमात ५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही घर विक्री करु शकता.
घर खरेदी केल्यावर घरात मूळ खरेदीदाराने राहणे सुद्धा आवश्यक असते.
तसेच या कालावधीत तुम्ही अनधिकत विक्री किंवा हस्तांतरण आढळल्यास म्हाडा तुमच्यावर कारवाई करु शकते. त्यासाठी तुम्हाला SRO, स्टॅंप ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरुन मालमत्ता नोंदणी करावी लागते.