Barefoot Walking Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Barefoot Walking: तुम्हाला माहितीये का? अनवाणी पायाने चालल्याने मेंदूला मिळते चालना

Barefoot Walking Benefits: मातीमध्ये, गवतावर अनवाणी पायाने चालण्याने खूप चांगले वाटते. गवतावर अनवाणी पायाने चालल्यावर पायाला मातीचा, गवताचा स्पर्श होतो. तेव्हा खूप मस्त वाटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मातीमध्ये, गवतावर अनवाणी पायाने चालण्याने खूप चांगले वाटते. गवतावर अनवाणी पायाने चालल्यावर पायाला मातीचा, गवताचा स्पर्श होतो. तेव्हा खूप मस्त वाटते. आता धावपळीचे जीवन किंवा पायाला धूळ लागण्याची भीती यामुळे कोणीच जमिनीवर अनवाणी चालत नाही. अनेकजण तर घरातदेखील मऊ चप्पल घाततात. या सवयींमुळे अनवाणी पायाने कुठे गेले तर पाय घाण होण्याची भीती असते. मात्र, अनवाणी पायाने चालणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनवाणी पायाने चालल्याने शरीर चांगले राहते.

मुलांना मैदानी खेळ खेळताना पायात चप्पला घालणे टाळा. अनवाणी चालल्याने त्यांना पायाला मातीची सवय होते. त्यामुळे मुलांच्या शरीराची वाढ होते. आज आम्ही तुम्हाला अनवणी चालण्याचे फायदे सांगणार आहोत.

पायाचे स्नायू मजबूत होतात

अनवाणी पायाने चालल्याने पायाचे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीराचे संतुलन राहते. जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने जमिनीवर चालता तेव्हा तुमच्या पायातील सेंसरी नर्व्हस अॅक्टिव होतात. त्यामुळे शरीराला चालना मिळते.

शांत झोप

अनवाणी पायाने चालल्याने झोपेची समस्या येत नाही. अनवाणी पायाने चालल्याने शरीर हलके आणि रिलॅक्स होते. त्यामुळे मानसिक तनाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री शांत झोप लागते.

रक्तभिसरण

अनवाणी पायाने चालल्याने शरीरातील नसांवर चांगला परिणाम होतो. या नसा मेंदूपर्यंत असतात. त्यामुळे रक्तभिसरण चांगले होते. यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते.

अनवाणी पायाने चालताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही सर्वप्रथम घरातच अनवाणी पायाने चालण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर त्याची माहिती तुम्हाला घरातच चालताना मिळेल. घरानंतर तुम्ही गार्डनमध्ये किंवा मैदानाता चालण्याची सवय करा. जर तुमच्या पायाला कोणतीही जखम असेल तर अनवाणी पायाने चालू नका. ज्या लोकांना डायबिटीज आहे. त्यांनी अनवाणी पायाने चालताना विशेष काळजी घ्यायला हवी. डायबिटीजच्या लोकांना जखम झाली तर ती बरी होणे कठीण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT