How To Clean Yellow Teeth at Home Saam Tv
लाईफस्टाईल

Teeth Cleaning at Home: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी या घरगुती टिप्सचा उपयोग करा, दात मोत्यासारखे चमकतील

Teeth Cleaning Tips in Marathi: चेहरा कितीही उजळ असला तरी चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारे रेखीव डोळे, टोकदार नाक आणि पांढरेशुभ्र दात याकडे जास्त लक्ष दिले जाते पाहिजे.

Manasvi Choudhary

आपण चेहऱ्याने कितीही सुंदर दिसत असलो तरी बोलताना किंवा हसताना आकर्षक ठरतात ते आपले दात (Teeth). दात हे पिवळे दिसू लागले तर आपल्याला एखाद्याशी बोलायला आणि हसायला लाज वाटते. यामुळे दातांची स्वच्छता राखणे हे महत्वाचे आहे.

चेहरा कितीही उजळ असला तरी चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारे रेखीव डोळे, टोकदार नाक आणि पांढरेशुभ्र दात याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

स्वच्छ दात हे निरोगी आरोग्याचे (Health) लक्षण आहे. आपण जे काही खातो ते तोंडावाटे पोटात जाते यामुळे दातांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. दात पिवळे असतील तर दातांमधून दुर्गंधी येणे ही समस्या निर्माण होते अशावेळेस दातांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. जर तुमचे दात पिवळे असतील तर काही घरगुती उपायांनी दात मोत्यासारखे चमकवा.

  • दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? या घरगुती टिप्स फॉलो करा

    चमकदार दात हे सर्वांनाच आवडतात. मात्र कालांतराने दात हे पिवळे होतातच. नियमितपणे दात घासूनही दातावरचा पिवळेपणा कमी होत नाही. यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत ते करून पाहा.

  • हळद (Turmeric)

    हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये असणारे आयुर्वेदीक गुणधर्म दातांच्या समस्या दूर करतात. हळदीमध्ये दात नैसर्गिकरित्या पांढरे करण्याचे गुणधर्म आहेत.

  • केळीची साल (Banana Peel)

    केळीची साल दातांवर घासल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होतो. केळीच्या सालीमध्ये लिमोनीन आणि सायट्रिक एॅसिड असते ज्यामुळे दात चमकू लागतात.

  • मीठ (Salt)

    फार पूर्वी लोक मिठाने दात घासायचे. मीठाने दात घासल्याने दातांतील जंतू तसेच दातातील पिवळेपणा कमी होतो.अर्धा चमचा मीठामध्ये मोहरी तेलाचे थेंब मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT