Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Ajit Pawar Pune Baramati Plane Crash Update : बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात अजित पवार यांच्या घटनेच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त करत तपासाची मागणी केली आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव आज बंद असणार आहे. यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे. अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत, असे पत्र लोणीभापकर ग्रामपंचायतीने पोलिसांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com