ROASTED GUAVA HEALTH BENEFITS saam tv
लाईफस्टाईल

थंडीच्या दिवसात पेरू भाजून खाण्याचे जबरदस्त फायदे!, चवीसोबत आरोग्यालाही होतील फायदे

ROASTED GUAVA HEALTH BENEFITS : सर्वसामान्यपणे आपण सगळेच पेरू कापून किंवा त्यावर मीठ-तिखट लावून खातो. पण तुम्हाला माहीत आहे का, पेरू भाजून खाल्ल्याने आरोग्याला एक वेगळाच आणि भारी फायदा मिळतो?

Saam TV News

हिवाळ्यात गरमागरम भाजलेला पेरू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सर्वसामान्यपणे आपण सगळेच पेरू कापून किंवा त्यावर मीठ-तिखट लावून खातो. पण तुम्हाला माहीत आहे का, पेरू भाजून खाल्ल्याने आरोग्याला एक वेगळाच आणि भारी फायदा मिळतो?

हा साधा-सोपा घरगुती उपाय हिवाळ्यात किंवा पावसात आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. भाजलेला पेरू खाल्ल्याने अनेक त्रासांपासून आराम मिळतो. चवीला अप्रतिम लागणारा हा उपाय शरीराला उबदार ठेवून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. जर तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने पेरू खाऊन कंटाळा आला असेल, तर हा हटके आणि आरोग्यदायी प्रकार नक्की ट्राय करा. आणि हा पेरु खाल्ल्याने शरीराला कोणते आरोग्या फायदे होतात हे जाणून घ्या.

पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम

पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पोटाच्या तक्रारी दूर करण्यास मदत करते. पेरू भाजल्यामुळे तो मऊ होतो आणि आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो.

हृदयाची काळजी

यामध्ये पोटॅशियम आणि विद्राव्य फायबर असतात. पोटॅशियममुळे शरीरातील सोडियमचे संतुलन राहण्यास मदत होते, तर विद्राव्य घटक रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

बदलत्या ऋतूत शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सची गरज असते. पेरूमध्ये हे घटक उत्तम प्रमाणात असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून सुरक्षित ठेवतात.

सर्दी-खोकल्यात आराम

हिवाळ्यात घसा खवखवणे किंवा खोकल्याचा त्रास होत असेल, तर कोमट भाजलेला पेरू खाल्ल्याने घशाला तात्पुरता आराम मिळू शकतो.

वजन नियंत्रणात मदत

पेरूमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार खाण्याची सवय सुटून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोरू भाजण्याची सोपी पद्धत

पेरू स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करा आणि तव्यावर किंवा मंद आचेवर हलका मऊ होईपर्यंत भाजून घ्या. त्यामध्ये अतिरिक्त साखर किंवा मीठ न घालताच हा पौष्टिक स्नॅक खाणे अधिक आरोग्यदायी ठरते. तसेच आहारात विविध फळे , भाज्यांचा देखील समावेश करणे तितकेच महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे करत होते उपमुख्यमंत्रिपद अन् अर्थखात्याची जुळवाजुळव, शिंदेसेनेच्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Mens Diwali Outfit: दिवाळीला दिसायचंय हँडसम आणि स्टायलिश? पुरुषांसाठी पाहा ७ ट्रेंडी ड्रेसिंग आयडिया!

8th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ८व्या वेतन आयोगात पगारासोबत मिळणार ४ मोठे भत्ते?

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

दोन वेळा एका मताने विजय, तिसऱ्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट; निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा

SCROLL FOR NEXT