Healthy Eating : डाळिंबाचे दाणे साठवण्याची 'ही' योग्य पद्धत वापराल, तर दिवसभर राहतील टवटवीत आणि रसरशीत

HOW TO STORE POMEGRANATE SEEDS : डाळिंब सोलणे हे बर्‍याचदा कंटाळवाणे काम वाटते, त्यामुळे अनेकजण एकदाच जास्त दाणे काढून हवाबंद डब्यात ठेवून देतात. पण काही वेळाने दाणे सुकतात किंवा त्यांना आंबट चव येऊ लागते.
HOW TO STORE POMEGRANATE SEEDS FRESH AND JUICY ALL DAY LONG
HOW TO STORE POMEGRANATE SEEDS FRESH AND JUICY ALL DAY LONG saam tv
Published On: 

डाळिंब फोडल्यानंतर त्यातील दाणे काढून साठवले जातात, पण काही काळानंतर हे दाणे सुकू लागतात. तर कधीकधी त्यांची चमक आणि ताजेपणाही कमी होत जातो. जर तुम्ही एक अख्खे डाळिंब एकाच वेळी फोडले आणि ते सर्व लगेच संपवण्याचा विचार नसेल, तर ते साठवण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. थोडी काळजी घेतल्यास, डाळिंबाचे दाणे अनेक दिवस ताजे राहू शकतात.

खरं तर, डाळिंबाची साल आतील दाण्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. जोपर्यंत फळ अख्खे असते, तोपर्यंत दाणे बाहेरील ओलावा आणि हवेच्या थेट संपर्कापासून सुरक्षित राहतात. तथापि, डाळिंब कापून आणि दाणे काढल्यानंतर, ते फ्रीजमध्ये साठवून ठेवणे आवश्यक ठरते. जर दाणे बाहेर ठेवले, तर ते लवकर खराब होऊ शकतात. डाळिंब खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सालीवर हलके डाग किंवा रंगात बदल दिसल्यास फळ खराब झाले आहे असे समजू नका. डाळिंबाची गुणवत्ता तपासण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्याचे वजन पाहणे. जे डाळिंब त्याच्या आकाराच्या मानाने जड वाटते, त्याचे दाणे रसदार असण्याची शक्यता जास्त असते.

HOW TO STORE POMEGRANATE SEEDS FRESH AND JUICY ALL DAY LONG
Air Pollution : विषारी हवेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर होतोय गंभीर परिणाम; डॉक्टरांचा गंभीर इशारा

हवाबंद डब्याचा वापर

डाळिंबाचे दाणे नेहमी काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावेत. त्यात हवा गेल्यामुळे दाणे लवकर सुकतात.

पेपर टॉवेलची ट्रिक

डब्यात दाणे भरण्यापूर्वी तळाशी आणि वरच्या बाजूने स्वच्छ टिश्यू पेपर किंवा किचन टॉवेल ठेवा. हा पेपर डाळिंबातील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे दाणे बरेच दिवस ताजे राहतात.

HOW TO STORE POMEGRANATE SEEDS FRESH AND JUICY ALL DAY LONG
चहाप्रेमींनो सावधान! चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' ५ गोष्टी, नाहीतर आतड्यांचा होईल सत्यानाश; वाचा सविस्तर

झिप-लॉक बॅग

जर तुम्हाला फ्रिजमध्ये साठवायचे असतील, तर सिलिकॉन किंवा झिप-लॉक पिशवीत हवा काढून दाणे ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकतात.

फ्रीझरचा पर्याय

जर डाळिंब महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकवायचे असतील, तर दाणे स्वच्छ करून एका थाळीत पसरवा आणि थोडे फ्रीजमध्ये गोठवून घ्या . त्यानंतर ते झिप-लॉक बॅगेत भरून डीप फ्रीजरमध्ये ठेवा. हवे तेव्हा काढून वापरता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.