Mangalwar Upay saam tv
लाईफस्टाईल

Mangalwar che Upay: करियर किंवा बिझनेसमध्ये अडचण आहे? मंगळवारच्या दिवशी करून घ्या हे उपाय

Tuesday remedies for career: जर तुमच्याही करिअरमध्ये किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल, अडथळे येत असतील, किंवा प्रगती थांबली असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारचा दिवस काही विशेष उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • मंगळवार हनुमानजीला समर्पित आहे आणि या दिवशी केलेली पूजा शक्ती, भक्ती आणि यश देते.

  • राम रक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने राम आणि हनुमानाची कृपा मिळते.

  • बुंदीचा नैवेद्य अर्पण करणे हे हनुमानजीचा आवडता प्रसाद मानला जातो.

मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित मानला जातो. या दिवशी भक्त श्रद्धेने बजरंगबली यांची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये हनुमानजी हे शक्ती, शांती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक मानलं गेलंय. असं मानलं जातं की, जो व्यक्ती मंगळवारी मनापासून प्रभु हनुमानांची उपासना करतो, त्याची सगळी दुःख, अडचणी, करिअरमधील अडथळे दूर होतात आणि जीवनात यश, समाधान आणि इच्छित फळ मिळतं.

तुमच्याही जीवनात जर नोकरी, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक किंवा इतर कोणतीही समस्या असतील तर मंगळवारी हे उपाय केल्यास त्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकणार आहे. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

राम रक्षा स्तोत्राचा पाठ करा

मंगळवारी हनुमानजींसोबत रामपरिवाराची देखील पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होतं. विशेषतः राम रक्षा स्तोत्राचा पाठ केल्यास प्रभु राम आणि हनुमानजींच्या कृपेने अडलेली कामं मार्गी लागतात. राम रक्षा स्तोत्रामुळे तुमचं संरक्षण होतं.

बुंदीचा नैवेद्य अर्पण करा

बुंदी हे हनुमानजींचा आवडतं प्रसाद मानलं जातं. मंगळवारी बुंदीचा नैवेद्य अर्पण केल्यास त्यांची विशेष कृपा होते. जर हा उपाय सलग ५ ते ६ मंगळवार नियमित केला तर धनलाभाचे योग तयार होतात. कामात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते.

या मंत्राचा जप करा

"ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" हा मंत्र मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळवारी या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास मनातील भीती दूर होते. यामुळे कामामध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. विशेषतः करिअर किंवा व्यवसायात निर्णयक्षमता वाढवण्यास हा उपाय मदत करतो.

हनुमान चालीसा वाचा

जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा पैशाच्या अडचणी असतील तर मंगळवारी पूजा करताना हनुमानजींच्या समोर तुपाचा दिवा लावून 'हनुमान चालीसा' वाचावी. हनुमान चालीसेचा नियमित पाठ केल्यास मनोबल वाढतं त्याचप्रमाणे संकटंही दूर होतात. हा एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय आहे.

लाल रंगाचे फल आणि फुलं अर्पण करा

मंगळवार हा लाल रंगाशी संबंधित आहे. तर लाल रंग हा उर्जेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे. या दिवशी लाल कपडे परिधान करा आणि हनुमानजींच्या पूजेत लाल रंगाची फुलं आणि फळं अर्पण करा. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात.

मंगळवार कोणाला समर्पित आहे?

मंगळवार हनुमानजीला समर्पित आहे.

राम रक्षा स्तोत्राचा पाठ करण्याचा फायदा काय आहे?

अडकलेली कामे मार्गी लागतात आणि संरक्षण मिळते.

हनुमानजीला कोणता प्रसाद अर्पण करावा?

बुंदीचा नैवेद्य अर्पण करावा.

मंगळवारी कोणता मंत्र जपावा?

"ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" हा मंत्र 108 वेळा जपावा.

पूजेत लाल रंग का वापरावा?

लाल रंग शक्तीचे प्रतीक आहे आणि हनुमानजी प्रसन्न होतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: पेनकिलर, अँटीबायोटिक्स खाण्याची सवय आहे? 'ही' औषधे घेतल्याने हृदयावर होतो परिणाम

Maharashtra Live News Update: निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या,जालन्यात खळबळ

Pankaj Deshmukh Death Case: आमदार कुटेंच्या कार चालकाचा संशयस्पद मृत्यू प्रकरण; भाजप कार्यकर्त्यांकडून देशमुख कुटुंबियांनी धमक्या

Credit Card: गर्दीत उभे राहाल, कंगाल व्हाल? टॅप अँड पे सुरू असल्यास खातं होईल रिकामी?

Marathi Language Controversy : तुम्ही मारहाण केल्याने मी लगेच मराठीत बोलेल का? भाषावादावर राज्यपालांचं मोठं भाष्य, VIDEO

SCROLL FOR NEXT