Kamika Ekadashi 2025: कामिका एकादशीला आज घरामध्ये 'या'ठिकाणी लावा पणती; नकारात्मक उर्जा असल्यास निघून जाईल

Sawan Kamika Ekadashi 2025: २१ जुलै २०२५ रोजी, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे, जिला कमिका एकादशी असे म्हटले जाते. भगवान विष्णूंना समर्पित असलेला हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.
Kamika Ekadashi 2025
Kamika Ekadashi 2025saam tv
Published On
Summary
  • कामिका एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित अत्यंत पवित्र तिथी आहे.

  • 21 जुलै 2025 रोजी कामिका एकादशी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आहेत.

  • या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते.

श्रावण महिना म्हणजे भक्ती आणि पूजा यांचा उत्सव मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते, पण त्याचबरोबर विष्णूभक्तांसाठीही या काळात काही खास तिथी असतात. अशाच एक तिथी म्हणजे कामिका एकादशी. ही श्रावण महिन्यात येणारी पहिली एकादशी असून भगवान विष्णूला समर्पित आहे.

कामिका एकादशी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी

आज 21 जुलै 2025 आहे. आजच्या दिवशी कामिका एकादशी आणि श्रावणाचा दुसरा सोमवार एकाच दिवशी येतोय. त्यामुळे यंदा एक विशेष आणि दुर्लभ योग तयार होणार आहे. या योगाला हरिहर योग म्हटलं जातं. या दिवशी एकाच वेळी भगवान विष्णू आणि भगवान शिवाची पूजा केल्याने अतिशय शुभ फल प्राप्त होतं. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि पूजांचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.

कामिका एकादशीचं महत्त्व काय?

धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी उपवास करून भगवंतांची भक्ती केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. शिवाय या दिवशी दीपदान करणं फार पुण्यकारी मानलं जातं. विशेषतः 5 विशिष्ट ठिकाणी दिवा लावल्याने शुभ फलाची प्राप्ती होते.

Kamika Ekadashi 2025
Shatank Yog: न्यायाधीश शनी तयार करणार अद्भुत योग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

कामिका एकादशीच्या दिवशी या 5 ठिकाणी दिवा लावा

तुळशीजवळ दिवा लावा

भगवान विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. म्हणून कामिका एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा एक दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समृद्धी लाभते.

घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा

घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने घरात सुखशांती येते आणि नकारात्मक शक्ती दूर जातात. एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा दरवाजाजवळ लावणं अत्यंत शुभ फलदायी असतं.

Kamika Ekadashi 2025
Friday Laxmi remedy: शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे 'हे' उपाय करा; आर्थिक संकटातून लगेच होईल सुटका

देवघर किंवा जवळच्या मंदिरात दिवा लावा

घरातल्या देवघरात दिवा लावल्याने घरात दिव्यतेचा वास होतो. त्याचप्रमाणे शक्य असल्यास जवळच्या विष्णू मंदिरात जाऊन दिवा लावा. हे कर्म भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे.

शिवमंदिरात दिवा लावा

कारण यावर्षी कामिका एकादशी सोमवारी आहे. बेलवृक्ष आणि शिवमंदिर दोघंही भगवान शंकराशी संबंधित आहेत. त्यामुळे याठिकाणी दिवा लावल्यास शिवकृपा आणि विष्णू-शिव दोघांची कृपा लाभते.

Kamika Ekadashi 2025
Ravivar Upay: कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य राहील एकदम ठणठणीत; रविवारच्या दिवशी करा फक्त हे उपाय

पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा

पीपळाच्या झाडाला धर्मग्रंथांमध्ये विशेष स्थान दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की, पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. त्यामुळे कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्याने पितृदोष कमी होतो आणि त्रिदेवांची कृपा मिळते.

Q

कामिका एकादशी कोणत्या महिन्यात येते?

A

कामिका एकादशी श्रावण महिन्यात येते.

Q

कामिका एकादशी कोणाला समर्पित आहे?

A

ही भगवान विष्णूला समर्पित आहे.

Q

21 जुलै 2025 रोजी कोणता विशेष योग तयार होत आहे?

A

कामिका एकादशी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी येत असल्याने हरिहर योग तयार होत आहे.

Q

कामिका एकादशीला कोठे दिवा लावणे शुभ मानले जाते?

A

तुळशीजवळ, घराच्या दरवाजाजवळ, देवघरात, शिवमंदिरात आणि पिंपळाच्या झाडाजवळ.

Q

कामिका एकादशीच्या दिवशी दीपदान का महत्त्वाचे मानले जाते?

A

या दिवशी दिवा लावल्याने पापांचा नाश होतो आणि समृद्धी, सुख-शांतीची प्राप्ती होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com