Migraine Relief google
लाईफस्टाईल

Migraine Relief: मायग्रेनचा त्रास वाढलाय? मार्केटमध्ये आलीये नवीन गोळी, झटक्यात मिळेल आराम

Migraine Treatment : भारतात वाढत्या मायग्रेन रुग्णांसाठी फायझरने रिमेगपेंट ही पाण्याशिवाय घेता येणारी ओडीटी गोळी लाँच केली आहे. ४८ तास आराम देणाऱ्या या औषधाला डीसीजीआयची मान्यता मिळाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

भारतात मायग्रेनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून २१३ दशलक्ष लोक प्रभावित आहेत.

फायझरने रिमेगपेंट ही पाण्याशिवाय घेता येणारी ओडीटी गोळी लाँच केली.

४८ तासांपर्यंत आराम देणारी आणि ओव्हरयूज हेडेक न करणारी गोळी.

भारतात मायग्रेनचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर आराम मिळावा यासाठी उपचाराची मागणी तज्ज्ञांकडे करतात. अर्थात याची गरज सुद्धा वाढत चालली आहे. अशातच फायझर कंपनीने भारतात मायग्रेनसाठी 'रिमेगपेंट' ही नवी ओरल डिसइंटीग्रेटिंग टॅबलेट (ओडीटी) लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गोळी तोंडात सहज विरघळते आणि पाण्याशिवायही घेता येते.

रिमेगपेंट म्हणजे काय?

रिमेगपेंट ही गोळी सीजीआरपी रिसेप्टर अॅण्टागोनिस्ट प्रकारातील औषध आहे. मायग्रेन दरम्यान होणाऱ्या वेदनांचा प्रमुख कारणीभूत घटक असलेल्या सीजीआरपी प्रोटीनवर ही गोळी काम करते. सध्या याचे ७५ मिलीग्रॅम डोस उपलब्ध असून जेवणाआधी किंवा नंतर केव्हाही गोळी घेता येते.

डीसीजीआयची मान्यता

भारतातील औषध नियंत्रक प्राधिकरणाने (DCGI) ट्रिप्टन औषधांना कमी प्रतिसाद देणाऱ्या प्रौढांमध्ये ऑरासह किंवा ऑराशिवाय होणाऱ्या मायग्रेनच्या उपचारासाठी या गोळीला मान्यता दिली आहे.

रिमेगपेंट घेतल्यानंतर जवळपास ४८ तासांपर्यंत आराम मिळतो. औषधाचा ओव्हरयूज हेडेक (अतिवापरामुळे होणारी डोकेदुखी) होत नाही. वेदना कमी झाल्यानंतर रुग्णाला लवकर कामावर परतण्यास मदत होते. भारतात जवळपास २१३ दशलक्ष लोकांना मायग्रेनचा त्रास आहे. मायग्रेनमुळे दरवर्षी सुमारे १७३ दिवस उत्पादनक्षमतेचे नुकसान होते. फायझरच्या मते, रिमेगपेंटसारखी औषधे मायग्रेन व्यवस्थापनात नवीन आणि प्रभावी पर्याय ठरू शकतात.

फायझरची नवीन थेरपी प्रगत उपचार पर्याय देत ही तफावत दूर करण्‍याचा प्रयत्‍न करते, तसेच मायग्रेनचे उत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍ससाठी दीर्घकाळापासून वैद्यकीय गरजेची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न करते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brushing Teeth At Night: रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचे फायदे काय ?

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

Actress Search on Google: गुगलवर सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रींना सर्च केलं जात आणि का? जाणून घ्या खास कारण

SCROLL FOR NEXT