Harmful Foods for Liver saam tv
लाईफस्टाईल

Fatty Liver: लिव्हर खराब होण्याचं कारण फक्त दारू नाही! हे ५ पदार्थ आहेत घातक, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Harmful Foods for Liver: बदलत्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढत आहे. दारूच नाही तर साखर, तळकट, रेड मीट आणि जास्त मीठही लिव्हर खराब करू शकतात, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक बाहेरच्या खाण्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात मोठ मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच किडनीच्या समस्या या खूप गंभीर मानल्या जातात. कारण किडनी आपल्या शरीरातील खूप महत्वाचा असतो. किडनी खराब होण्याची कारणे अनेकांना फक्त दारूचे सेवन वाटते. मात्र तज्ज्ञांनी पुढील चार पदार्थांचे सेवन केल्यानेही तुमच्या किडन्या खराब होऊ शकतात असे सांगितले आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

अलीकडील रिपोर्टनुसार भारतातील जवळपास 38.6% प्रौढ आणि 35.4% मुलांमध्ये फॅटी लिव्हरची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी योग्य आहार आणि जीवनशैली बदलण्याचा सल्ला दिला आहे.

पहिला पदार्थ

लिव्हर खराब होण्यामध्ये जास्त साखर असलेले पदार्थ महत्वाची भूमिका बजावतात. मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, फळांचे पॅक ज्यूस, कुकीज आणि जास्त साखर असलेल्या खाद्यपदार्थांमुळे शरीरात फॅट वाढतो आणि ते थेट लिव्हरमध्ये साचत जातो.

दुसरा पदार्थ

याशिवाय तळकट पदार्थ आणि जास्त फॅट असलेले अन्न जसे की बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राइज, पॅक फूड आणि फास्ट फूड पचायला कठीण असतात आणि त्यामुळे लिव्हरवर ताण येतो. हळूहळू लिव्हरमध्ये सूज आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढते.

तिसरा पदार्थ

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटदेखील लिव्हरसाठी धोकादायक आहे. बेकन, सॉसेज आणि डेली मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं, ज्यामुळे लिव्हरचे नुकसान होते.

चौथा पदार्थ

अनेक लोकांना माहित नसतं पण जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळे देखील लिव्हरवर वाईट परिणाम होतो. कॅन्ड फूड्स, फ्रोजन फूड्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पाणी साठते आणि लिव्हर कमजोर होऊ शकतं.

पाचवा पदार्थ

तसेच रिफाइंड कार्बोहायड्रेट असलेले खाद्यपदार्थ जसे की सफेद भात, पांढरे ब्रेड आणि पेस्ट्रीमध्ये फायबर कमी असतं. हे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात आणि त्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला सुरुवात होते. तज्ज्ञ सांगतात की लिव्हर निरोगी चांगले ठेवायचे असेल तर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जास्त साखर, मीठ आणि तळकट पदार्थांपासून दूर राहणं अत्यावश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, धर्मेंद्र यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची भावुक प्रतिक्रिया

Pension: ३० नोव्हेंबरआधी ही ३ कामे कराच, अन्यथा मिळणार नाही पेन्शन; थेट नोटीस येणार

Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

Shocking : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून बापाच्या डोक्यात हैवान घुसला, मुलीसमोरच आईची केली हत्या

Dharmendra Death: जय-विरूची जोडी तुटली; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन भावुक

SCROLL FOR NEXT