Back Massage: घरच्या घरी पाठीचा मसाज कसा करायचा? वाचा सोपी पद्धत

Manasvi Choudhary

पाठदुखी

कामाच्या ठिकाणी एकाच जागी दिवस दिवसभर बसून राहिल्याने पाठीचा त्रास उद्भवतो अनेकांची पाठ दुखते.

Back Massage

पाठीचा मसाज

यासाठी तुम्ही घरच्या घरी पाठीचा मसाज करू शकता पाठीचा मसाज करण्याची सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Back Massage

कोमट तेल करा

मसाज करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही खोबरेल किंवा मोहरीचे तेल कोमट करून घ्या. तुम्ही या तेलामध्ये लसूण देखील मिक्स करू शकता.

Back Massage

सपाट जागी करा मसाज

मसाज करण्यासाठी जागा ही सपाट असावी त्यावर तुम्ही चटई किंवा मॅट टाका.

Back Massage

पाठीवर तेल लावा

पाठीवर कोमट तेल टाका आणि दोन्ही हातांच्या तळव्यांनी ते पूर्ण पाठीवर पसरवा.

Back Massage

हााताने मालिश करा

हाताचे तळवे पाठीवर ठेवून कणा  सोडून बाजूच्या स्नायूंवर खालून वरच्या दिशेने लांब आणि संथ हात फिरवा. किमान ५-१० वेळा असे करा.

Back Massage

योग्य मळण्याची पद्धत

जसे आपण पीठ मळतो, तसे हाताच्या बोटांनी आणि अंगठ्याने पाठीचे स्नायू हलके दाबा आणि सोडा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Back Massage

गोल मसाज करा

पाठीच्या कण्याजवळच्या स्नायूंवर बोटांच्या टोकांनी छोटे छोटे गोल आकारात मसाज करा. कण्याच्या हाडावर थेट जोरात दाब देऊ नका.

Back Massage

next: Kalamkari Saree Designs: कलमकारी साड्यांचे युनिक 5 पॅटर्न, या डिझाईन्स नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...