Sunday Horoscope: या ५ राशींवर येणार संकट! अडचणींचा करावा लागेल सामना, वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस सुदिनच म्हणावा लागेल. मनात ठरवले काय याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आज घडतील. काहीतरी महत्त्वाचे निर्णय आज तुमचे मार्गी लागणार आहेत.

Mesh | saam tv

वृषभ

जोडीदाराकडून धनालाभाची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये मात्र व्यत्यय दिसतो आहे. चुकीच्या गोष्टी करण्याच्या मागे लागू नका. अधिक पैशाची हाव आज बरी नव्हे हे लक्षात ठेवा.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

बौद्धिक असणारी आपली रास. कोर्टाच्या कामात सहज बाजी माराल. आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाणार आहात.यामध्ये आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

हाताखाली लोकांपासून सावध राहण्याचा आज इशारा आहे. महत्त्वाचे ऐवज जिन्नस संभाळा विनाकारण डोकेदुखी वाढेल. कोणाच्या अति आहारी गेल्यास मनस्वास्थ बिघडणार आहे.

kark | saam tv

सिंह

रवी उपासना करावी. शेअर्स आणि लॉटरी मध्ये यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागणार आहेत. प्रेमामध्ये महत्त्वाचा टप्पा आज पार कराल. मात्र आपला आब राखून कामे करावेत.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

नव्याने खरेदी विशेषतः पुस्तक खरेदी जवळच्या लोकांबरोबर बौद्धिक चर्चा होतील. मात्र सुखाला दिवस चांगला आहे. आपली द्विधावस्था मात्र टाळणे आज गरजेचे आहे.

kanya | saam tv

तूळ

भावंडांचे सौख्य मिळेल. एखादा मोलाचा सल्ला त्यांच्याकडून सहज मिळेल. त्या मार्गावर गेल्यास आपला पराक्रम वाढीस लागेल. जवळचे प्रवास होतील. शेजारी आपल्या मताशी सहमत असतील. दिवस चांगला आहे.

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

धनकारक असा दिवस आहे. पण जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.वारसा हक्काशी निगडित काही प्रश्न रेंगाळलेले असतील तर आज ते सुरळीत मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज आपल्या लहरीपणावर मात करून पुढे जाल. स्वतःसाठी जगण्याचा निर्धार करून कामे करा. आपला प्रभाव इतरांवर आहे. दिवस व्यस्त आणि धावपळीचा असेल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

पैसे जपून वापरणे आज गरजेचे आहे. अनेक गोष्टींचा गैरवापर होईल. मग ती आपली मानसिकता सुद्धा असू शकेल.यासाठी आपली अवस्था कधी कधी चीधरण उशाशी, ओरड घशाची" अशी होते हे टाळणे गरजेचे आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

मैत्रीचे बंध घट्ट होतील. काहीतरी संशोधनात्मक कार्यात एकत्रित रित्या मिळून सहभाग घ्याल. परदेशी वार्तालाप होतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

प्रेमाने जग जिंकता येते हे आज नव्याने जाणवेल. कामाच्या ठिकाणी आपण आज पर्यंत केलेल्याची पावती मिळेल. आपल्या लोकांच्याकडून स्नेहाला स्नेह असे भावना जोडत नवीन साखळी तयार कराल.

Meen | Saam Tv

Chanakya Niti: हे ४ नियम पाळा, आयुष्यात कधीच होणार नाही अपमान, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

life lessons
येथे क्लिक करा