दिवाळी सणांचा राजा. दिवाळीच्या सणाचा उत्साह देशभरात सर्वत्र पाहायला मिळतो. दिवाळीला दीपावली म्हणूनही ओळखले जाते. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.
दिवाळीत घराबाहेर तोरण, अंगणात रांगोळी, आकाश कंदील, आतेषबाजी आणि खमंग असा फराळाची चव आपल्याला चाखता येते. हा सण अगदी थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा दिवाळीचा हा सण १२ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना दिवाळीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या (Diwali) हार्दिक शुभेच्छा..!
2. स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला (Festival)
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
3. घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
4. लक्ष दीप हे उजळले घरी (Home)
दारी शोभली कडा रांगोळी,
फुलवाती अंगणात सोनसकाळी
आली दिवाळी, आली दिवाळी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
5. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
6. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी मेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
7. पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत.
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.