Dussehra Wishes  Saam Tv
लाईफस्टाईल

Dasara Greetings 2023: तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना मराठीमध्ये द्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Vijayadashami 2023 Wishes: दसरा सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात.

Priya More

Dasara Wishes In Marathi:

हिंदु पंचागानुसार अश्विन महिन्यात (Ashwin Month) शुक्ल पक्षातील दशमीला (Dashami) विजयादशमी (Vijayadashami 2023) म्हणजेच दसरा (Dussehra 2023) दसरा सण साजरा केला जातो. दसरा सण हा सडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात सोनं एकमेकांना देऊन शुभेच्छा देत सण साजरा केला जातो.

दसरा सणाला ‘दशहरा’ असं देखील म्हटलं जातं. यामागचं कारण म्हणजे या दिवशी भगवान रामाने दहा तोंडाच्या लंकापती रावणाचा वध करून विजय मिळवला होता. दसरा सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात. दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहन, सोने खरेदी केले जाते. त्याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात, नवीन घरात गृहप्रवेश देखील केला जातो.

दसरा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी २४ ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी दसरा सण साजरा केला जाणार आहे. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दसऱ्यानिमित्त सर्वजण आपले नातेवाई, मित्रपरिवार आणि कुटुंबियांना सोनं म्हणजेच आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देतात. यावर्षी तुम्ही देखील तुमच्या मित्र परिवारासह नातेवाईकांना मराठीमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करु शकता… ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. झेंडूची तोरणं आज लावा दारी,

सुखाचे किरण येऊद्या घरी

पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. आला आला दसरा,

दुःख आता विसरा

चेहरा ठेवा हसरा,

साजरा करु दसरा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. आनंदाचा सण,

प्रेमाचा वर्षाव..

गोडाचा प्रकार,

दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

4. आपट्याची पाने, झेंडुची फुले,

घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..

दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

5. उस्तव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा...

नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा...

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. लाखो किरणी उजळल्या दिशा,

घेऊनी नवी उमेद, नवी आशा,

होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

7. पुन्हा एक नवी पहाट,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला,

पुन्हा एक नवी दिशा...

नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

8. दुष्टांचा नाश, सर्वांचा विकास.

रावणाप्रमाणे प्रत्येक वाईट जळू दे,

आशा आणि विकासाची फुले फुलू दे.

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

9. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

सोन्यासारख्या लोकांना

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!

10. भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11. देवी दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

आणि तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंद देवो

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

12. बांधू तोरण दारी

काढू रांगोळी अंगणी

उत्सव सोने लुटण्याचा

करुनी उधळण सोन्याची

जपून नाती मनाची

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

13. दसरा म्हणजे सीमोल्लंघन

मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो

शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

14. वाईटावर चांगल्याची मात

महत्व या दिनाचे असे खास

जाळोनिया द्वेष- मत्सराची कात

मनोमनी वसवी प्रेमाची आस

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

SCROLL FOR NEXT