TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

IT Job Crisis: आयटी क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. टीसीएस कंपनीने ३० हजार कर्मचाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. युनियनने हा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या जोरदार चर्चा होत आहे.
TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट
TCS LayoffsSaam Tv
Published On

Summary -

  • युनियननं टीसीएसवर ३० हजार कर्मचाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचा आरोप केला आहे.

  • टीसीएसने फक्त १२ हजार नोकरकपात मान्य केली. कारण स्किल मिसमॅच आणि प्रकल्पांचा अभाव असल्याचे कारण दिले.

  • आयटी क्षेत्रात २०२५ मध्ये आतापर्यंत ९४ हजार नोकऱ्या कमी होणार आहेत.

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

12 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आता टीसीएस मोठी नोकरकपात करणार आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आता आक्रमक झालेत. नेमकं प्रकरण काय? टीसीएसनं काय स्पष्टीकरण दिलयं. आयटी क्षेत्रावर बेरोजगारीचं सावट का पसरलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

तुम्ही आयटी क्षेत्रात नोकरी करताय. तर तुमची नोकरी धोक्यात आहे. असं आम्ही म्हणतोय, कारण आता देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या टीसीएसमधून १२ हजार नव्हे तर 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचा आरोप युनियन ऑफ आयटी अँड आयटीईएस एम्प्लॉईज संघटनेनं केलाय. टीसीएस कर्मचाऱ्यांना सक्तीनं राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचा दावा युनियननं केलाय.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट
Unacademy Layoff: Unacademy ने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, कारण ऐकून तुमचीही चिंता वाढेल!

2025 च्या पहिल्या 6 महिन्यात 94 हजार टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात. मायक्रोसॉफ्टने 15 हजार तर टीसीएसनं 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय मेटा, गुगल, अमेझॉन यांनी 20 ते 25 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. तर डेल कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे निर्देश दिलेत.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट
Dell Layoff : AI उठलं 12500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर, तुमची नोकरीही धोक्यात?

टीसीएसमध्ये 6 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यामुळे नोकरकपात फक्त 12 हजार कर्मचाऱ्यांपूरती मर्यादीत असल्याचं टीसीएसनं सांगितलयं. तसचं ही नोकरकपात कौशल्य अभाव, स्किल मिसमॅच आणि प्रकल्पांच्या अभावामुळे केली जात असल्याचंही टीसीएसनं सांगितलयं. एआयमुळे याआधी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेली नोकरकपात पाहता आयटीसह इतर क्षेत्रातील नवोदित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांनीही बदलत्या काळानुसार नवं कौशल्यांवर भर द्यायला हवा.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट
BYJU’s Layoff : BYJU’s ने दिला झटका, 1000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com