Manasvi Choudhary
अश्विन शुद्ध दशमीचा दिवस म्हणजे दसरा
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला विजयादशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उत्सवानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो.
दसऱ्याच्या या दिवशी लक्ष्मी पूजन तसेच शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते.
या दिवशी सोनं म्हणून आपटयाची पानं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. ही फार जुनी परंपरा आहे.
'बौहिनिया रेसीमोसा' असे आपट्याच्या पानाचं शास्त्रीय नाव आहे
आपट्याची पाने तम-रजात्मक असल्याने त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण वातावरणात शुद्धता निर्माण करतात. यामुळे आपट्याची पाने दसऱ्याला सोनं म्हणून देतात.
आपट्याच्या पानात ईश्वरी तत्वाचा वलय निर्माण होतो.त्यामुळे ती पाने एकमेकांना दिल्यावर दोन्ही व्यक्तींच्यात आनंदाचे आणि स्नेहपुर्वक संबंध निर्माण होतात अशी भावना आहे.
भगवान श्रीरामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आपट्याच्या झाडाला वंदन करत विजयासाठी प्रार्थना केली होती असे मानले जाते.
आपट्याच्या पानांना स्पर्श केल्याने भगवान श्रीरामाने युद्ध जिंकले अशी मान्यता आहे. त्यामुळेच विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने देतात.