Happy Birthday PM Modi  Saam Tv
लाईफस्टाईल

Happy Birthday PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस गुपीत, सर्वांनी फॉलो कराव्या अशा 5 सवयी

PM Modi's Birthday : पंतप्रधान मोदींसाठी वय हा फक्त एक आकडा आहे कारण त्यांची फिटनेस ही त्यांच्या वयापेक्षा खूप चांगली आहे.

Shraddha Thik

PM Modi Fitness :

पंतप्रधान मोदींसाठी वय हा फक्त एक आकडा आहे कारण त्यांची फिटनेस ही त्यांच्या वयापेक्षा खूप चांगली आहे. खरं तर, पीएम मोदी आजच्या तरुणांसाठीच नव्हे तर चाळीशीनंतर आळशी झालेल्यांसाठीही प्रेरणास्थान आहेत. त्यांचे सक्रिय मन असो किंवा शारीरिक आरोग्य असो, ते निरोगी असण्याची खरी व्याख्या सांगतो.

अशा स्थितीत अनेकदा लोकांच्या मनात (Mind) विचार येतो की, एवढ्या व्यस्त दिवसांमध्ये पंतप्रधान कसे स्वस्थ राहतात? तर, त्याचे रहस्य या गोष्टींमध्ये दडलेले आहे ज्याचा उल्लेख त्यांनी स्वतः कधी ट्विटद्वारे तर कधी अनेक माध्यमांच्या मुलाखतींमध्ये केला आहे.

या 5 गोष्टी आहेत पंतप्रधान मोदींच्या फिटनेसचे रहस्य

दिवसाची सुरुवात पंचतत्त्व योगाने करा

मोदीजी पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या निसर्गाच्या पाच घटकांशी संबंधित योग करतात. यामध्ये पीएम मोदी विरुद्ध दिशेला चालतात, चिखलात चालतात आणि एका खडकावर पाठीवर झोपतात आणि अशा प्रकारे पाच तत्वांपासून बनलेला हा योग करतात. शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी आणि स्नायूंच्या हालचाली सुधारण्यासाठी हे उपयुक्त आहे.

आठवड्यातून दोनदा निद्रा योग

जेव्हा पीएम मोदींना त्यांच्या एका मुलाखतीत विचारण्यात आले की तुम्ही झोपेची (Sleep) कमतरता कशी बॅलेन्स करता? किंवा तुम्ही टाइट शिफ्ट कसे मॅनेज करता? त्यांनी याबद्दल सांगितले, यामध्ये ध्यानाच्या आसनात असताना शरीर झोपेत जाते, परंतु ही झोप इतकी प्रभावी असते की शरीर रिचार्ज होते आणि काम करण्याची मानसिक क्षमता वाढते.

आहारात शेवगाच्या शेंगांचे पराठे

मोदीजींनी फिट इंडिया आंदोलनादरम्यान सांगितले होते की, ते त्यांच्या आहारात शेवगाच्या शेंगांच्या पराठ्यांचा समावेश करतात. हा पराठा हलका असण्यासोबतच अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, जे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि रोगांपासून संरक्षण मिळते. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने त्यात अँटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते जे रोगांपासून बचाव करण्‍यासाठी आणि शरीरातील अनेक समस्या दूर करण्‍यासाठी उपयुक्त आहे.

रात्री वाघरेली खिचडी

मोदीजींना रात्री (Night) प्रसिद्ध गुजराती वाघरेली खिचडी खायला आवडते. हे तांदूळ, मूग डाळ, हळद आणि मीठ पासून बनवले जाते आणि अगदी साधे अन्न आहे. रात्रीचे जेवण प्रथिने समृद्ध आणि साधे ठेवल्याने ऊर्जा तर मिळतेच पण वजन संतुलित ठेवण्यासही मदत होते.

रोग टाळण्यासाठी हळद

आजारांपासून बचाव करण्यासाठी मोदीजी हळदीचे सेवन करतात. एकदा त्यांनी सांगितले की त्यांची आई त्यांना विचारायची की तू हळद घेतली की नाही? म्हणूनच ते हळदीचे सेवन करायला विसरत नाहीत. हळद हे करक्युमिन आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी भरलेले असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि नंतर अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यात मदत करते. म्हणून, जर तुम्हाला मोदीजींप्रमाणे तंदुरुस्त राहायचे असेल, तर या टिप्स तुमच्या आयुष्यातही अवलंब करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT