Hair Fall Reasons Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Falls Remedy : केस सतत गळतात? अकाली पांढरे झालेले केस काळे, घनदाट करायचेत? तुमच्या किचनमध्येच सापडेल उपाय...

White Hair Problems : अकाली केस गळणे व केस पांढरे होणे ही आजच्या तरुणाईसाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब ठरली आहे.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : हल्ली केस गळणे व पिकण्याच्या समस्येवरुन अनेकजण त्रस्त आहेत. केसांच्या वाढीसाठी व गळण्यापासून रोखण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. अकाली केस गळणे व केस पांढरे होणे ही आजच्या तरुणाईसाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब ठरली आहे.

खाण्यापिण्याच्या पद्धती व खराब पाण्यामुळे केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. परंतु, ही समस्या आता लहानपणापासून मुलांमध्ये दिसून येत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस (Hair) पातळ होतात व हळूहळू गळू लागतात. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय (Home remedies) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस काळे व घनदाट तर होतीलच पण ते, गळण्यापासून देखील रोखले जातील.

1. मेथीचे दाणे:

तज्ञांच्या मते, मेथीच्या दाण्यांचा वापर आपण आहारात करतो. मेथीचे दाणे वापरल्याने केस गळणे आणि केस पांढरे होणे टाळता येते. वापर कसा करायचा हे जाणून घेऊया

2. याप्रकारे करा वापर

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात (Water) भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाळून पेस्ट बनवा. नंतर केसांना लावा. त्यात दही, मध, कोरफडीचे जेल मिक्स करून हवे असल्यास अंडीही घालू शकता. हे साधारण महिनाभर किंवा आठवड्यातून दोन-तीन वेळा लावल्याने तुमच्या केसांमध्ये फरक दिसेल. यामुळे तुमचे केस काळे, दाट, रेशमी होतील आणि नवीन केसही मुळापासून वाढू लागतील.

3. केसांसाठी नारळ फायदेशीर आहे?

नारळाचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. रोज नारळाच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केस गळणे आणि पांढरे होणे टाळता येते. केसांना कोमट खोबरेल तेल लावल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragi Or Oats: नाचणी की ओट्स वजन कमी करण्यासाठी काय ठरेल बेस्ट

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

SCROLL FOR NEXT