H1N1 eye symptoms saam tv
लाईफस्टाईल

H1N1 eye symptoms: तुम्हालाही फ्लूनंतर डोळ्यांत जळजळ होतेय? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतो मोठा धोका

Influenza eye symptoms: एच१एन१ किंवा इन्फ्लुएन्झानंतर डोळे लाल होणे, पाणी येणे, जळजळ, वेदना किंवा अंधुक दिसणे अशी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं कधी गंभीर ठरू शकतात, डोळे चोळणं का टाळावं आणि डॉक्टरांकडे कधी जावं, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

एच१एन१ किंवा इन्फ्लुएन्झा म्हटलं की ताप, खोकला, अंगदुखी, घसा खवखवणं आणि अशक्तपणा ही लक्षणं आपल्या लक्षात येतात. मात्र फ्लूचा परिणाम फक्त श्वसनसंस्थेवरच होतो असं नाही. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही या संसर्गाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळे लाल होणं, डोळ्यांतून पाणी येणं, जळजळ होणं किंवा डोळ्यांत काहीतरी गेल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात.

फ्लूमुळे डोळ्यांचा त्रास होण्याचं प्रमाण कमी आहे. तरीही डोळ्यांमध्ये काही बदल जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर किंवा आजारातून बरे झाल्यानंतरही डोळ्यांचा त्रास कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

ओजस आय हॉस्पिटल्सचे रेटिना, मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. रोहन देढिया यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “फ्लू झाल्यानंतर डोळ्यांशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. डोळे लाल होणे, वेदना होणे किंवा दृष्टीत बदल जाणवणे ही लक्षणं गंभीरपणे घ्यायला हवीत. फ्लू कमी झाल्यानंतर डोळ्यांची जळजळही कमी होऊ शकते. मात्र त्रास पुन्हा सुरू झाला किंवा वाढला तर नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. पुरेसं पाणी प्यावं, डोळे चोळू नयेत आणि हात स्वच्छ ठेवावेत. वेदना वाढत असतील, प्रकाश पाहताना त्रास होत असेल किंवा अंधुक दिसत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

डोळे लाल होणे, जळजळ होणे

इन्फ्लुएन्झामुळे काही रुग्णांना कंजक्टिव्हायटिसचा त्रास होऊ शकतो. याला सामान्य भाषेत डोळे येणे असं म्हणतात. यामध्ये डोळे लाल होतात आणि त्यातून पाणी येतं. डोळ्यांत जळजळ होणे किंवा काहीतरी टोचल्यासारखं वाटणं अशी लक्षणंही दिसतात.

मात्र डोळे लाल होण्यामागे फक्त फ्लू हेच कारण असेल असं नाही. धुळीची किंवा इतर गोष्टींची अॅलर्जी, दुसरा विषाणूजन्य संसर्ग किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग यामुळेही डोळे लाल होऊ शकतात. त्यामुळे डोळे लाल झाले म्हणून स्वतःच आजाराचं निदान करू नये. योग्य कारण समजण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

डोळे चोळू नका

डोळ्यांना खाज किंवा जळजळ होत असेल तर डोळे चोळण्याची इच्छा होते. मात्र असं करणं टाळा. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्यामुळे त्रास वाढू शकतो आणि संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार हात धुणं गरजेचं आहे. रुमाल, टॉवेल किंवा डोळ्यांना लागणाऱ्या इतर वस्तू दुसऱ्या व्यक्तीसोबत वापरू नयेत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या व्यक्तींचे डोळे लाल झाले किंवा डोळ्यांत अस्वस्थता जाणवली तर लेन्सचा वापर थांबवावा. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

'ही' लक्षणं दिसल्यास सावध व्हा

फ्लू कमी झाल्यानंतर डोळ्यांतून पाणी येणं किंवा डोळे लाल होणं कमी होऊ शकतं. मात्र काही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. डोळ्यांत जास्त वेदना होणे, डोळ्यांना सूज येणे किंवा प्रकाश पाहताना त्रास होणे अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांकडे जावं. डोळ्यांतून चिकट पदार्थ येणे, अंधुक दिसणे किंवा दृष्टी कमी होणे हीदेखील महत्त्वाची लक्षणं आहेत.

फ्लूमुळे डोळ्यांना गंभीर त्रास होण्याचं प्रमाण फार कमी आहे. तरीही काही वैद्यकीय अहवालांमध्ये कंजक्टिव्हायटिससोबत डोळ्यांच्या आतील भागात सूज येण्याचे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं योग्य ठरेल.

डॉक्टरांकडे कधी जावं?

फ्लू बरा झाल्यानंतरही डोळ्यांचा त्रास कमी होत नसेल किंवा उलट वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांत वेदना होणे, अंधुक दिसणे किंवा दृष्टीमध्ये अचानक बदल जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांना आधीपासून डोळ्यांचा आजार आहे त्यांनी अधिक काळजी घ्यावी. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनीही डोळ्यांमध्ये काही त्रास जाणवल्यास सावध राहावं.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरात शिल्लक असलेले अँटीबायोटिक किंवा स्टिरॉइडचे आय ड्रॉप्स वापरू नयेत. कारण डोळ्यांच्या त्रासाचं कारण वेगवेगळं असू शकतं आणि त्यानुसारच योग्य उपचार ठरवले जातात.

डोळ्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

एच१एन१ किंवा इन्फ्लुएन्झाचा परिणाम मुख्यतः श्वसनसंस्थेवर होतो. मात्र काही वेळा या संसर्गामुळे डोळ्यांमध्येही त्रास होऊ शकतो. बहुतेक वेळा फ्लू बरा झाल्यानंतर डोळ्यांचा त्रासही कमी होतो.

तरीही डोळे सतत लाल राहणे, वेदना होणे, डोळ्यांतून चिकट पदार्थ येणे किंवा दृष्टीमध्ये बदल होणे अशी लक्षणं दिसत असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच तपासणी केल्यास डोळ्यांच्या इतर समस्या ओळखता येतात आणि योग्य उपचार सुरू करता येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

Google ने Gmail केलं अपडेट, आणलं भन्नाट फीचर; सर्वांनाच होणार फायदा

फडणवीस सरकारचे ५ मास्टरस्ट्रोक! शेतकरी, म्हाडा रहिवासी ते कृषी विभागासाठी मोठे निर्णय, वाचा A टू Z माहिती

Coconut Oil for Cooking: महिनाभर नारळाच्या तेलामध्ये अन्नपदार्थ बनवा, शरीरात 5 मोठे बदल झालेले दिसतील

SCROLL FOR NEXT