GBS Kolhapur Death saam tv
लाईफस्टाईल

GBS Kolhapur Death: जीबीएसमुळे 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कोल्हापूरात हाहाकार माजवणारा आजार नेमका काय? लक्षणं कोणती? A टू Z माहिती

Guillain-Barre Syndrome Explainer: कोल्हापुरातील कळंबा येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काय आहे जीबीएस आजार? त्याची लक्षणं, कारणं, संसर्गाशी असलेला संबंध आणि उपचारपद्धती जाणून घ्या. हातापायांना मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Surabhi Jayashree Jagdish

‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) मुळे कळंब्यामधील ११ वर्षीय राजवर्धन नितीन बुचडे याचा मृत्यू झाला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना काल त्याने अखेरचा श्वास घेतला. राजवर्धन सध्या महालक्ष्मी गल्ली, कळंबामध्ये येथे राहत होता. या घटनेनंतर कळंबा गावात आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जातेय. महालक्ष्मी गल्ली, राम गल्ली, हनुमान गल्ली, टिपुगडे गल्ली आणि तिवले गल्ली या भागांमध्ये तपासणीवर विशेष भर दिला जात आहे.

जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम आणि सरपंच सुमन गुरव यांनी नागरिकांना घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. गावातील जलवाहिनीत सांडपाणी मिसळते का, याचीही तपासणी केली जातेय. प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे पाण्याची तपासणी केली जातेय. तसंच आशा सेविकांची बैठक घेऊन आरोग्य तपासणीचा कालावधी वाढवण्यात आलाय.

कणेरीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मस्के यांनी सांगितलं की, "प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे गावातील जलवाहिनीत सांडपाणी मिसळते का, याची तपासणी करत आहोत. आशा सेविकांची बैठक घेऊन तपासणीचा कालावधी वाढवला."

काय आहे गुलियन बैरे सिंड्रोम?

गुलियन बैरे सिंड्रोम एक अशी परिस्थिती आहे- ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती नसांवर हल्ला करते. यामुळे खूप विकनेस येऊ शकतो. हात-पाय बधिर होऊ शकतात आणि पॅरालॅसिस होण्याची शक्यता असते. जीबीएस दुर्मिळ आहे. यात शरीराचे स्नायू अचानक कमकुवत होतात आणि याचा परिणाम बहुतांश भागांवर पहायला मिळतो.

अमेरिकेतील क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, जीबीएसमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती असामान्य किंवा विचित्र पद्धतीने रिस्पॉन्ड करते आणि पेरिफेरिअर नसांवर हल्ला करते. काहीवेळाने हा हल्ला अचानक थांबतो. योग्य उपचाराने रुग्ण पूर्णत: बरे होतात. पण, आपलीच रोगप्रतिकारशक्ती नसांवर असा अचानक हल्ला का करते? याचं ठोस कारण अजूनही डॉक्टरांना सापडलेलं नाही.

मेयो क्लिनिकच्या रिडीयो पॉडकास्टमध्ये बोलताना न्यूरोमस्कुलर मेडिसिनचे डॉ. जेम्स डेक सांगतात, मोलॅक्युलर मिमिक्री नावाचा एक कॉन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. यात आपल्या नसांतील काही गोष्टी व्हायरस किंवा इंन्फेक्शनसारख्या भासतात. रोगप्रतिकारशक्ती गोंधळून जाते. आणि व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी नसांवर हल्ला करते.

गुलियन बैरे सिंड्रोमची लक्षणं काय?

रुग्णांना लक्षणं दिसू लागल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात खूप विकनेस येतो. हाता-पायात किंवा बोटांना मुंग्या येत असतील. ही लक्षणं फार वाढत नसतील तर डॉक्टरांना तात्काळ दाखवा असा सल्ला तज्ज्ञ देतात. गुलियन बैरीची लक्षणं अचानक दिसून येतात. शरीराच्या दोन्ही बाजूला यामुळे त्रास होतो. याची सुरूवात पायांपासून होते आणि त्यानंतर हे हात आणि चेहऱ्यापर्यंत पसरतं.

मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, गुलियन बैरे सिंड्रोमची लक्षणं-

  • हाता-पायाची बोटं, घोटा किंवा मनगटाला टोचल्यासारखं वाटतं

  • पायात खूप विकनेस येतो

  • चालताना किंवा जीने चढताना त्रास होतो

  • बोलणं, चावणं किंवा गिळण्यात अडथळा येतो

  • डोळ्यांनी गोष्टी दोन दिसतात किंवा डोळे हलवता येत नाहीत

  • खूप वेदना होतात आणि क्रॅम्प येतात. खासकरून रात्री

  • हृदयाचे ठोके वाढतात, ब्लडप्रेशर कमी होतं आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो

गुलियन बैरे सिंड्रोम कशामुळे होतो?

गुलियन बैरे सिंड्रोम होण्याचं ठोस कारण अजूनही तज्ज्ञांना माहिती नाही. आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार यात शरीरातील स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसांना दुखापत होते. या नसा वेदना, शरीराचं तापमान आणि स्पर्शाचं सेन्सेशन यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. जागतिक , यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाता-पायात स्पर्शाचं सेन्सेशन रहात नाही आणि गिळण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होतो.

क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, शरीरात संसर्गानंतर जीबीएसचा धोका असतो. संशोधकांना आढळून आलंय की, जवळपास 70 टक्के लोकांना संसर्गानंतर एक ते सहा आठवड्यात लक्षणं दिसून लागली. रोगप्रतिकारशक्ती अचानक विचित्र प्रतिसाद देऊ लागते. पेरिफेरिअल नसांवर हल्ला करते. त्यामुळे जीबीएस होतो. पण हा इतर आजारांसारखा आयुष्यभर रहात नाही.

संशोधकांच्या माहितीनुसार, डायरिया किंवा श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे जीबीएस होण्याची शक्यता असते. जीबीएसच्या 3 पैकी 2 रुग्णांमध्ये जीबीएसच्या आधी डायरिया किंवा श्वसनमार्गाचा आजार झाल्याचं दिसून आलंय. बॅक्टेरियामुळे होणारा डायरिया याचं प्रमुख कारण असू शकतं. फ्लूसारख्या व्हायरल इंन्फेक्शनमुळेही जीबीएस होण्याची शक्यता असते.

यावर उपचार आहेत का?

गुलियन बैरे सिंड्रोमवर ठोस अशी उपचारपद्धती नाही. पण उपचारांमुळे याची लक्षणं कमी करू शकतो किंवा याचा कालावधी कमी होऊ शकतो. यात रुग्णाच्या जीवाला धोका असल्यामुळे रुग्णालयात उपचाप अत्यंत महत्त्वाचे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, यावर इम्युनोथेरपीने उपचार केले जातात. ज्यात रक्तातील प्लाझ्मा काढला जातो. यावर प्रक्रिया करून तो पुन्हा शरीरात सोडला जातो. यात हल्ला करणाऱ्या अॅन्टीबॉडीज काढल्या जातात.

लक्षणं दिसू लागल्यानंतर 7 ते 14 दिवसात ही थेरपी खूप फायदेशीर ठरते. गुलियन बैरे सिंड्रोमच्या रुग्णाला फिजीओथेरपी, ओक्युपेशनल थेरपी आणि बोलण्यास त्रास होत असेल तर स्पीच थेरपी दिली जाते. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, इम्युनोग्लोब्युलिन्सचं इंजेक्शन एक प्रभावी थेरपी आहे. यात रुग्णाला प्रोटीन दिले जातात. जे रोगप्रतिकार करतात आणि नसांवरचा हल्ला थांबवतात. सोप्या शब्दात निरोगी माणसाच्या शरीरातील इम्युनोग्लोब्युलिन्स गुलियन बैरे सिंड्रोमच्या रुग्णाला दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सकाळी सकाळी पश्चिम रेल्वेला लेटमार्क, ३० मिनिटे उशिराने धावतेय लोकल

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार मोडला, लग्नाच्या ४ वर्षांनी घेतला घटस्फोट

मुंबई हादरली! घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

Tandoori Chai Recipe : चहाप्रेमींसाठी खास रेसिपी! हॉटेलसारखा तंदुरी चहा आता घरातच, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Red eyes in the morning: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल दिसतात? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT