Gudi Padwa festival google
लाईफस्टाईल

Gudi Padwa Traditional Food: गुढीपाडवा स्पेशल! घरीच बनवा साखरेच्या गाठी, तोंडात टाकताच विरघळतील

Gudi Padwa Special Recipes: तुम्ही पारंपारिक पद्धतीने पाडवा साजरा करणार असाल तर तुम्ही सगळं साहित्य घरच्या घरी सोप्या पद्धतीने सगळी तयारी करू शकता. गुढी सजवण्याच्या साहित्यात तुम्ही साखरेच्या गाठी सुद्धा सोप्या आणि झटपट पद्धतीने तयार करू शकता.

Saam Tv

गुढीपाडवा हा हिंदू वर्षातला सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या दारात सुंदर गुढी उभारली जाते. चाळ असो वा इमारत प्रत्येकाच्या दारात विविध रंगांची आणि पाना फुलांनी सजवलेली गुढी दिसते. तर गुढी सजवताना आपल्याकडे साडीचे पीस किंवा ब्लाउज पीस, कडूलिंबाची पाने, फुलांनी विणलेला हार, तांब्याचा कलश, आंब्याची डहाळी, अष्टगंध, हळद-कुंकू, आणि साखरेच्या गाठी हे साहित्य लागते. ( Gudi Padwa Special Recipe)यातील अनेक साहित्य तुम्हाला विकत आणावं लागत असेल. पण तुम्ही पारंपारिक पद्धतीने पाडवा साजरा करणार असाल तर हे सगळ तुम्ही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

गुढी पाडव्यासाठी साहित्य आणायला गेलात की बाजारात अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी साखरेच्या गाठी तुम्हाला बाजारात मिळतील. सध्या साखरेच्या गाठींमध्ये विविध डिझाइन सुद्धा पाहायला मिळतात. पण तुम्ही तुमच्या आणि पारंपारिक पद्धतीने गुढी सजवणार असाल तर सगळं साहित्य तुम्ही घरी करू शकता. हार विणू शकता, गुढी घरीच शिवून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखरेच्या गाठी सुद्धा घरीच तयार करू शकता. चला तर जाणून घेऊ याची सोपी आणि पारंपारिक रेसिपी.

गुढी पाडव्यासाठी साहित्य आणायला गेलात की बाजारात अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी साखरेच्या गाठी तुम्हाला बाजारात मिळतील. सध्या साखरेच्या गाठींमध्ये विविध डिझाइन सुद्धा पाहायला मिळतात. पण तुम्ही तुमच्या आणि पारंपारिक पद्धतीने गुढी सजवणार असाल तर सगळं साहित्य तुम्ही घरी करू शकता. हार विणू शकता, गुढी घरीच शिवून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखरेच्या गाठी सुद्धा घरीच तयार करू शकता. चला तर जाणून घेऊ याची सोपी आणि पारंपारिक रेसिपी.

साखरेच्या गाठी बनवण्याचे साहित्य

साखर १ कप

पाणी दीड कप

तूप १ चमचा

धागा

खाण्याचा (रंग इच्छेनुसार )

कृती

१. सगळ्यात आधी अप्प्यांचे भांडे असेल ते घ्या. त्यांना व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घ्या. मग त्यामध्ये तुम्हाला जेवढी माळ हवी त्यापेक्षा थोडा जास्त धागा त्यामध्ये मिक्स घाला.

२. आता एका पॅनमध्ये साखर घ्या आणि त्यात पाणी घालून चांगली उकळवून घ्या.

३. आता तुमचा एकतारी पाक तयार झाला असेल.

४. पाक घट्ट तयार झाल्या ती लगेच गॅस बंद करा.

५. आता त्यामध्ये चमचाभर तूप आणि तुम्हाला हवा असलेला खाण्याचा रंग घाला.

६. हे मिश्रण चांगले मिक्स करा. गाठी ठेवू नका.

७. त्यानंतर हा पाक अप्पे तयार करण्याच्या भांड्यात घाला.

८. थोडा वेळ त्याला हात लावू नका.

९. थंड झाल्यावर तयार होईल साखरेच्या गाठी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक, राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT