Google Chrome Update Saam Tv
लाईफस्टाईल

Google Chrome Update: सरकारने दिला युजर्सना इशारा! त्वरीत गुगल क्रोम अपडेट करण्याचे आदेश, कारण काय?

कोमल दामुद्रे

How To Update Google Chrome : तुम्हीही गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक अलर्ट आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने म्हटले आहे की क्रोम ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी आहेत ज्या तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

CERT-In या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एजन्सीने क्रोम ब्राउझरबाबत उच्च-स्तरीय चेतावणी जारी केली आहे. सरकारने म्हटले आहे की Chrome च्या विशिष्ट आवृत्तीमध्ये सुरक्षा त्रुटी आहे जी Chrome च्या Windows आणि Mac दोन्ही आवृत्तींमध्ये आहे.

CERT-In ने सांगितले आहे की क्रोममधील (Chrome) या त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स सिस्टम हॅक करू शकतात आणि वैयक्तिक माहिती चोरू (Hack) शकतात. याशिवाय, या त्रुटीचा फायदा घेऊन, वापरकर्त्यांच्या सिस्टममध्ये मालवेअर देखील स्थापित केले जाऊ शकतात.

गुगल (google) क्रोमबाबत एजन्सीने म्हटले आहे की, यामध्ये अनेक त्रुटी आहेत ज्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरचे नियंत्रण हॅकर्सच्या हाती येऊ शकते. या त्रुटींच्या मदतीने हॅकर्सना हे देखील कळू शकते की तुमच्या ब्राउझरमध्ये कोणते पेमेंट एपीई आहे. Chrome मध्ये, यात प्रॉम्प्ट्स, वेब पेमेंट API, SwiftShader, Vulkan, Video आणि WebRTC मध्ये आहेत. या त्रुटींच्या मदतीने हॅकर्सना रिअल टाइममध्येही ट्रॅक करता येऊ शकते.

1. CERT-In च्या मते, Chrome मध्ये या त्रुटी आहेत

CVE-2023-4068, CVE-2023-4069, CVE-2023-4070, CVE-2023-4071, CVE-2023-4072, CVE-2023-4073, CVE-2023-4074, CVE-2023-4075, CVE-2023-4076, CVE-2023-4077, CVE-2023-4078

CERT-In नुसार, Linux आणि Mac साठी Google Chrome च्या 115.0.5790.170 आणि पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये दोष आहे. दुसरीकडे, Windows साठी Chrome ची 115.0.5790.170/.171 आणि पूर्वीची आवृत्ती धोकादायक आहे. एजन्सीने म्हटले आहे की या त्रुटी टाळण्यासाठी, त्वरित प्रभावाने तुमचा Google Chrome ब्राउझर अपडेट करा.

2. Google Chrome कसे अपडेट कराल?

  • संगणकावर किंवा लॅपटॉपवर Chrome ब्राउझर उघडा.

  • आता उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन बिंदूंवर क्लिक करा.

  • त्यानंतर खालील हेल्प बटणावर क्लिक करा आणि नंतर Google Chrome वर जा.

  • येथून तुम्ही तुमचे Chrome अपडेट करू शकता आणि त्याची नवीनतम आवृत्ती देखील जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT