Ather Energy 450S Launch : भारतीय बाजारात Ather Energy ची 450S इलेक्ट्रिक स्कूटर आज लॉन्च होणार आहे. जी देशांतर्गत बाजारात स्वस्तात ऑफर केली जाणार आहे. अशातच ही कंपनी आज एक नाही तर तीन ई-स्कूटर लॉन्च केल्या जाणार आहे.
सदर माहिती ही कंपनीने जारी केल्याला टीझर व्हिडीओमधून कळाली आहे. कंपनीने सांगितले की, आज एकाच वेळी तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये 450S एक असेल.
कंपनीने (Company) सांगितले की, या तीन ई-स्कूटर 11 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. या तीनपैकी एक 450S असेल, तर उर्वरित दोन स्कूटरबद्दल कंपनीने अद्यापह काही स्पष्टपणे सांगितले नाही. यामध्ये फक्त कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर 450X असू शकते, ज्याची वैशिष्ट्ये आणि श्रेणी आणखी सुधारित करून सादर केली जाऊ शकते. याशिवाय, कंपनीने असेही संकेत दिले आहेत की या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) 450S सीरीजचा भाग असतील.
1. Ather 450S बॅटरी पॅक आणि फीचर
Ather च्या नवीन 450S इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, ते 3 kWh बॅटरी पॅकसह ऑफर केले जाईल. ज्याची IDC प्रमाणित श्रेणी 115 किलोमीटर पर्यंत असेल. आणि या स्कूटरची किंमत (Price) 1.30 लाख रुपये एक्स-शोरूम असेल. त्याच वेळी, बाजारात आल्यानंतर, 450S ची स्पर्धा ओलाच्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air शी होईल, जी सध्या 1.10 लाख एक्स-शोरूमच्या किमतीत विकली जात आहे. जी कंपनीतर्फे दिली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.