गुगलने नुकतेच Play Store वरुन काही अॅप्सना बंदी घातली आहे. हे ९ अॅप्समध्ये क्रिप्टो अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्समध्ये एक त्रुटी आढळून आली, ज्यामुळे अॅप्स लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहेत.
जर तुम्ही देखील फोनवर (Phone) क्रिप्टो अॅप्स वापरत असल्यास तुम्ही देखील फोनमधून हे अॅप्स लगेच हटवा. कारण हे अॅप्स अधिकृतपणे गुगल (Google) प्ले स्टोअर इंडियावरुन काढून टाकण्यात आले आहे. गुगलने ज्या अॅप्सवर कारवाई केली आहे त्यामध्ये Binance आणि Kraken सारख्या अॅप्सचा समावेश आहे.
1. अॅप्सना बंदी का घालण्यात आली?
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय बौद्धिक युनिट (FIU)ने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अॅपविरोधात नोटीस जारी केली होती. त्यामुळे या अॅप्सवर कारवाई करण्यात आली. यामध्ये FIU ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) या ९ अॅप्सना आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या URL ला ब्लॉक करण्यास सांगितले आहे.
2. या अॅप्सवर बंदी घालण्यात आली
Binance
कुकोइन
हुओबी
क्रॅकेन
Gate.io
बिट्रेक्स
बिटस्टॅम्प
MEXC ग्लोबल
बिटफेनेक्स
3. नियमांचे उल्लंघन केल्यास काय होईल?
अॅपवरील मनी लाँडरिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्यास भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारताने या आधीच क्रिप्टोकरन्सीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताने क्रिप्टोकरन्सीच्या वापरास मान्यता दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Bank) ५ वर्षांपूर्वी क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर बंदी घातली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.