ONDC Feature Saam Tv
लाईफस्टाईल

Paytm च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज! ऑनलाईन शॉपिंग होणार मिनिटात, कसे? वाचा एका क्लिकवर

ONDC On Paytm : फिनटेक कंपनी Paytmने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) संदर्भात एक नवीन खेळी खेळली आहे. सध्या हे ONDC फीचर ट्रायल बेसिसवर आहे. पेटीएमचे हे पाऊल असे दर्शवते की कंपनी पुन्हा एकदा ई-कॉमर्स क्षेत्रात आपला प्रवेश वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Shraddha Thik

ONDC Feature On Paytm :

प्रसिद्ध फिनटेक कंपनी Paytmने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) संदर्भात एक नवीन खेळी खेळली आहे. सध्या हे ONDC फीचर (Feature) ट्रायल बेसिसवर आहे. पेटीएमचे हे पाऊल असे दर्शवते की कंपनी पुन्हा एकदा ई-कॉमर्स क्षेत्रात आपला प्रवेश वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पेटीएम प्रथम ONDC च्या शॉपिंग अ‍ॅप (App) संबंधित प्रयत्न करत आहेत. या नवीन फीचर अंतर्गत, पेटीएमने आपल्या होमपेजवर QRcode च्या पुढे ONDC चा पर्याय दिला आहे. पेटीएम अ‍ॅपच्या होम पेजवर QR कोड स्कॅनरच्या शेजारी ONDC पर्याय सुरू करण्यात आला आहे, त्यावर क्लिक करून युजर्स शॉपिंग करू शकतात.

युजर्सना हा पर्याय त्यांना नेहमी तळाशी दिसेल. ONDC वर क्लिक (Click) केल्यानंतर, एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये वरच्या बाजूस 'Paytm Love ONDC' लिहिलेले आहे. पेटीएमने हे ओएनडीसी पेज पुन्हा डिझाइन केले आहे. नवीन लँडिंग पेजवर युजर्सना खाद्यपदार्थ, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन इत्यादी कॅटेगिरीमध्ये खरेदीसाठी ऑफर आणि सूट असे अनेक गोष्टी पाहायला मिळतील.

Paytm ने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा Ola, PhonePe, Meesho आणि Shiprocket सारख्या अनेक टेक युनिकॉर्नने अलीकडेच सरकारच्या ONDC पेजला सपोर्ट करत आहेत. भारताच्या ऑनलाइन रिटेल मार्केटवरील Amazon, Flipkart, Zomato आणि Swiggy यांसारख्या काही कंपन्यांनी मार्केटमध्ये पकड मजबूत केली आहे.

UPI च्या पहिल्या वेळी पेटीएम इतर कंपन्यांच्या तुलनेत चुकली असल्याचे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे, Google Pay आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्या मार्केट लीडर बनल्या आहेत.

आता ओएनडीसीच्या बाबतीत, पेटीएम ही चूक पुन्हा करू इच्छित नाही आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छित आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वृत्तपत्राने सांगितले की, 'Paytm चे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा हे स्वतः ONDC ची वाढ कशी होत आहे यात खूप रस घेत आहेत.

2018 च्या सुरूवातीला अलिबाबा आणि सॉफ्टबँक सारख्या गुंतवणूकदारांकडून $2 बिलियन पेक्षा जास्त मुल्यांकनाने $400 दशलक्ष जमा केले होते. तथापि, अलिबाबाने 2022 मध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीवर कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT