कॅन्सर हा एक गंभीर आजार मानण्यात येतो. हा आजार शरीराच्या इतर अवयवयांवरही परिणाम करतो. स्वादुपिंडाचा कॅन्सर हा त्याचीलच एक मानला जातो. कोणत्याही आजाराचं उशीरा निदान होणं हे गंभीर मानलं जातं. त्यामुळे यावर उपचार करणं खूप कठीण होतं.
मात्र आता या कॅन्सरच्या उपचारांबद्दल एक चांगली बातमी समोर आलीये. नुकतंच एका अभ्यासातून असं दिसून आलंय की, औषधांचं एक नवं कॉम्बिनेशन या कॅन्सरला दूर करू शकतं. हा स्टडी नेमका काय आहे ते पाहूयात.
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये नुकत्याच पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, स्पॅनिश शास्त्रज्ञांनी उंदरांवर औषधांच्या एका नवीन कॉम्बिनेशनची यशस्वी टेस्टींग केलीये. या प्रयोगात असं आढळून आलंय की, कोणत्याही गंभीर दुष्परिणामांशिवाय ट्यूमर पूर्णपणे नष्ट झाला.
हा शोध पॅनक्रियाटिक डक्टल एडेनोकार्सिनोमा (PDAC) च्या उपचारांसाठी चांगला ठरू शकतो. या कॅन्सरमुळे जगण्याचा दर पूर्वी अत्यंत कमी मानला जात होता. मात्र आता शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा शोध मानवांमध्ये भविष्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी मार्ग मोकळा करेल.
जर आपण आकडेवारी पाहिली तर स्वादुपिंडाचा कॅन्सर हा जगातील १२ वा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. मात्र त्याचा मृत्युदर खूप जास्त आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगभरात या कॅन्सरच्या अंदाजे ५००,००० नव्या रुग्णांचं निदान झालं होतं. त्यापैकी अंदाजे ४००,००० रुग्णांचा मृत्यू झालाय. ही आकडेवारी दर्शवते की, हा आजार किती जीवघेणा आहे.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरला सायलेंट किलर म्हणतात. याचं कारण म्हणजे तो कोणतीह लक्षणं न दाखवता इतर अवयवांवर परिणाम करतो. या कॅन्सरबाबत हे सर्वात मोठं आव्हान मानलं जातं. सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरचा ट्यूमर शोधणं कठीण होतं. त्याचप्रमाणे गॅस, अपचन किंवा सौम्य पोटदुखी यासारखी त्याची लक्षणं अगदी सामान्य असल्याने निदान करणं कठीण होतं.
कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं
सौम्य पण सतत पोटदुखी
थोडेसे खाल्ल्यानंतर भूक न लागणं
खूप जास्त थकवा
वयाच्या ५० नंतर डायबेटीजचं निदान
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.