Vastu Shastra saam tv
लाईफस्टाईल

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास कामं जरूर करा

Goddess Lakshmi evening arrival: हिंदू धर्मशास्त्रानुसार, धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी हिचे आपल्या भक्तांवर विशेष प्रेम असते. लक्ष्मीजींच्या कृपेने घरात धन, वैभव आणि सुख-शांती नांदते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट शुभ वेळ असते.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मी यांना धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानण्यात येतं. लक्ष्मी देवेची ज्यांच्यावर कृपा असते त्यांच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही असं मानण्यात येतं. शास्त्रांनुसार दिवसातील एक विशिष्ट वेळ अशी असते ज्यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करतात. त्या वेळी काही चुका टाळणे अत्यावश्यक असते, अन्यथा लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते.

संध्याकाळी घरात प्रवेश करतात माता लक्ष्मी

शास्त्रांनुसार, देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश संध्याकाळी म्हणजे गोधूलि वेळेला मानला जातो. हा वेळ साधारण सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंतचा असतो. या काळात काही विशेष उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्याचं आगमन होतं.

मुख्य द्वार खुलं ठेवणं

सूर्यास्तानंतर काही वेळ घराचं मुख्य द्वार खुलं ठेवणं शुभ मानण्यात येतं. यामुळे देवी लक्ष्मीचं स्वागत होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा, शांती व समृद्धीचा प्रवाह वाढतो.

घराची स्वच्छता

संध्याकाळी घर स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे. असं मानलं जातं की, स्वच्छ घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील कोणताही कोपरा अंधारात ठेऊ नका. त्याचप्रमाणे घरात कोणत्याही ठिकाणी अस्वच्छपणा राहू नये.

मुख्य द्वारावर दीप प्रज्वलन

घराच्या मुख्य द्वारावर आणि मंदिरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं शुभ मानण्यात येतं. हे देवी लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक असून घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्य स्थिर राहतं.

संध्याकाळी टाळाव्यात अशा चुका

तुलसीच्या रोपाला स्पर्श करू नये

संध्याकाळी तुलसीच्या रोपाला स्पर्श करणं किंवा हात लावणं अशुभ मानण्यात येतं. कारण हा वेळ विश्रांतीचा असतो आणि तुलसी देवीची पूजा रात्री केली जात नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी धनाचे व्यवहार करणंही टाळलं पाहिजे. कारण यामुळे घरातील लक्ष्मी दूर जाऊ शकते आणि आर्थिक स्थैर्य कमी होऊ शकणार आहे.

राग आणि वादविवाद टाळा

संध्याकाळी घरात शांतता आणि सौहार्द राखणं अत्यावश्यक आहे. या वेळी वाणी आणि वर्तनावर संयम ठेवणाऱ्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास होतो आणि सुख-समृद्धी कायम राहतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT