Goa Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

Goa Tour Package : IRCTC चा नवा टूर पॅकेज! लॉग वींकेडला मित्रांसोबत करा गोव्याचा प्लान, बजेटमध्ये कराल धमाल

Goa Travel Plan : नवीन वर्षात सगळ्यांनीच काहीना काही नियोजन केले असेलच. नव्या वर्षात अनेक सुट्ट्या आहेत ज्यामुळे आपण फिरण्याचे प्लान करु शकतो. जानेवारी महिन्यात देखील वीकेंड येत आहे. अशावेळी फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही गोव्याला जाऊ शकता.

कोमल दामुद्रे

Goa Trip Plan :

नवीन वर्षात सगळ्यांनीच काहीना काही नियोजन केले असेलच. नव्या वर्षात अनेक सुट्ट्या आहेत ज्यामुळे आपण फिरण्याचे प्लान करु शकतो. जानेवारी महिन्यात देखील वीकेंड येत आहे. अशावेळी फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही गोव्याला जाऊ शकता.

IRCTC ने नवीन टूर पॅकेज आणले आहे. यावेळी तुमच्या मित्रांसोबत गोव्याचा प्लान फसणार नाही. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करता येईल. जाणून घेऊया टूर पॅकेज बद्दल

पॅकेजचे नाव- ग्लोरियस गोवा माजी लखनौ

पॅकेज कालावधी- 3 रात्री आणि 4 दिवस

प्रवास मोड- फ्लाइट (Flight)

कुठे जायचे?- गोवा (Goa)

1. या सुविधा मिळतील?

  • यामध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटचे तिकीट मिळेल.

  • राहाण्यासाठी हॉटेल सुविधादेखील मिळणार आहे.

  • या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना नाश्ता आणि रात्रीचे जेवणही मिळणार आहे.

  • या टूर पॅकेजमध्ये ट्रॅव्हल (Travel) इन्शुरन्सची सुविधाही मिळणार आहे.

2. खर्च किती येईल?

  • या ट्रिपमध्ये तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर तुम्हाला ४४,७०० रुपये मोजावे लागतील.

  • तर कपल्ससाठी प्रति व्यक्तीला ३७,१०० रुपये द्यावे लागतील.

  • तीन जण असाल तर प्रति व्यक्तीला ३६,३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

  • जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर बेडसाठी ५ ते ११ वर्ष असणाऱ्या तुम्हाला ३१, ७०० रुपये भरावे लागतील. बेड हवा नसेल तर ३०, ९५० रुपये द्यावे लागतील.

  • IRCTC ने हा टूर पॅकेजची माहिती ट्विट करुन दिली आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गोवा फिरता येईल. IRCTC च्या या टूरचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

3. कसे कराल बुक?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरुन बुकिंग करु शकता. याशिवाय IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT