Nashik Kalaram Temple: नाशिकमधील काळाराम मंदिराचे नाव असे का? या ठिकाणी कसे जाल?

How To Reach at Nashik Kalaram Mandir: नाशिक या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य होते.
Story Behind The Name Kalaram How to visit at Nashik Kalaram Mandir
Story Behind The Name Kalaram How to visit at Nashik Kalaram MandirSaam Tv
Published On

Nashik Kalaram Mandir :

नाशिक या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य होते. रामचंद्राच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याची पदचिन्हे आजही या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील एक नाशिकचे काळाराम मंदिर.

लवकरच अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यापूर्वीच नरेंद्र मोदी नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अतिप्राचीन काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती काळाराम मंदिराचे पुजारींनी दिली आहे.

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. १७७८ -१७९० या काळात गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधले. या मंदिरात (Temple) श्रीरामासह सीता देवी आणि लक्ष्मणाची ही मूर्ती पाहायला मिळते.

Story Behind The Name Kalaram How to visit at Nashik Kalaram Mandir
Mumbai Trans Harbour Link: सागरी सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; वेगमर्यादा किती? कोणत्या वाहनांना असेल परवानगी?

1. काळाराम मंदिर असे नाव का पडले?

नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरे आहेत. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण यामध्ये काळाराम मंदिराचे वैशिष्ट्य थोडे वेगळे आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने असून त्याची बांधणीही खास आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हटले जाते.

2. ६९ फूट कळस

काळाराम मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूतीचे मंदिर आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना तर मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावर सुंदर अशी नक्षी आहे.

Story Behind The Name Kalaram How to visit at Nashik Kalaram Mandir
Long Weekend ला पार्टनरसोबत बजेटमध्ये फिरा अलिबाग, ट्रिप होईल एकदम भारी!

मंदिराच्या कळसाची उंची ६९ फूट आहे. कळस हा ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला कोटही आहे. मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्‍या आहेत. एकावर दुसरा पाषाण रचून मंदिराचे बांधकाम केले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.

3. कसे जाल? (how to reach?)

  • रस्त्याने जाण्यासाठी मुंबईहून १६० किलोमीटर व पु्ण्याहून २१० किलोमीटरवर आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरुन नाशिकला जाऊ शकतो.

  • रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास नाशिक मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकडे (Mumbai) जाणार्‍या जवळपास सर्व गाड्या नाशिकमधूनच जातात.

  • नाशिकला जाण्यासाठी तुम्ही हवाई मार्गाचा देखील वापर करु शकता. किंगफिशरद्वारे मुंबई ते नाशिक हवाई वाहतूक केली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com