Long Weekend ला पार्टनरसोबत बजेटमध्ये फिरा अलिबाग, ट्रिप होईल एकदम भारी!

Place To Visit With Partner : मुंबई आणि त्याच्यालगत अनेक समुद्रकिनारे आहेत जे आजही डोळ्याचे पारणं फेडतात. त्यातील एक अलिबाग. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाणही आहे.
Alibaug Travel Plan
Alibaug Travel Plan Saam Tv
Published On

Alibaug Travel Plan :

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले... समुद्र म्हटलं की डोळ्यांसमोर दृश्य येते ते खळखळणाऱ्या लाटा आणि गारवा. मुंबई आणि त्याच्यालगत अनेक समुद्रकिनारे आहेत जे आजही डोळ्याचे पारणं फेडतात. त्यातील एक अलिबाग. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाणही आहे.

'मिनी गोवा' म्हणून अलिबागला (Alibaug) ओळखले जाते. अलिबाग हे मुंबईजवळील सुंदर समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण आहे. अलिबाग हे ठिकाणं अनेक प्रेमीयुगलांसाठी खास आहे. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात. लॉग वीकेंडला तुम्ही देखील फिरण्याचा (Travel) प्लान करत असाल तर अलिबागमधील या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या.

मुंबईपासून ११० किलोमीटर अंतरावर अलिबाग आहे. तर पेण अलिबागपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन अलिबागला बोटीने समुद्राची सफर (Trip) करता येते. या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेत शॉपिंग आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेता येऊ शकतो. अलिबाग तुम्हाला हॉटेलचे रेट साधारणत: ७०० ते १५०० रुपयांमध्ये सहज मिळू शकते.

1. मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड-जंजिरा किल्ला हा पाण्यात आहे. हा अलिबागपासून ५४ किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता. हिवाळ्यात येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

Alibaug Travel Plan
IRCTC चा नवा टूर प्लान! Family सोबत करा अंदमानची ट्रिप, खर्च किती? जाणून घ्या सर्वकाही

2. हरिहरेश्वर मंदिर

अलिबागजवळील रायगडमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक भगवान हरिहरेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणचे हवामान अतिशय थंड आणि आल्हाददायक आहे. अलिबागमध्ये बरेची मंदिरे आहेत. जिथे आपल्याला प्राचीन काळातील बौद्ध गुहा आणि मंदिरांना भेट देऊ शकता.

3. अलिबाग बीच

अलिबागला गेलात तर समुद्रकिनाऱ्याला नक्कीच भेट द्या. अलिबाग बीचवरुन तुम्हाला कुलाबा किल्ल्याचे सुंदर दृश्य पाहाता येईल. तसेच या ठिकाणी जेट स्की, स्कूबा डायव्हिंग आणि कयाकिंग यांसारख्या वॉटर अॅक्टिव्हिटीज करता येईल.

Alibaug Travel Plan
Andaman Nicobar Trip : २० हजारात फिरता येईल लक्षद्वीपसह अंदमान-निकोबार, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

4. नागाव बीच

अॅडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नागाव बीचवर जाऊ शकता. हा बीच स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसाठी फेमस आहे. हे ठिकाण अलिबागपासून ९ किलोमीटर अंतरावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com