Budget Friendly Foreign Destinations Saam tv
लाईफस्टाईल

Budget Friendly Foreign Destinations : कमी बजेटमध्ये करा फॉरेनची वारी ! जगभरातील हे 5 देश आहेत अधिक सुंदर

Travel Trip : जर तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची असेल तर या देशांना भेट द्या

कोमल दामुद्रे

Foreign Trip : आपल्यापैकी अनेकांना कुठे तरी फिरायला जाण्याची इच्छा असते. आयुष्यात एकदा तरी फॉरेनला जावेसे वाटते. परंतु, आपल्या स्वप्नांच्या मार्गात अनेक अडचणी येतात. जर तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची असेल तर या देशांना भेट द्या

जगभरात असे अनेक देश आणि ठिकाणे (Place) आहेत जिथे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये फिरु शकतात. हे देश भेट देण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी, खाण्यासाठी आणि राहण्यासाठीही अनेक स्वस्त पर्यायही येथे उपलब्ध आहेत. तर या यादीत कोणत्या देशांचा समावेश आहे, चला जाणून घेऊया...

1. मलेशिया (लँगकावी/पेनांग)

परदेशात जायचे असेल तर मलेशिया हा उत्तम पर्याय आहे. जिथे बजेटमध्ये (Budget) स्ट्रोलरची मज्जा लुटता येईल. पेनांग शहर हे पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला शांतता आवडत असेल तर तुम्ही मलेशियातील लँगकावीलाही जाऊ शकता. येथे अधिक पर्यटकांची अधिक गर्दी नसते. मलेशियामध्ये आल्यावर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. येथील स्थानिक लोकांचे वर्तन देखील अतिशय मैत्रीपूर्ण आहे, त्यामुळे शहराचा शोध घेणे सोपे होते.

2. व्हिएतनाम आणि कंबोडिया

परदेशात फिरणाऱ्यांच्या यादीत व्हिएतनामचे नाव नक्कीच समाविष्ट आहे. हा एक अतिशय सुंदर आणि शांत देश आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे. भारतीय चलनाचे मूल्य येथे अधिक जास्त आहे. हा देश सुंदर बौद्ध मंदिरे (Temple), संग्रहालये आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनाम त्याच्या अद्वितीय फ्रेंच ऑब्जेक्ट आर्टसाठी देखील ओळखले जाते. व्हिएतनाममध्ये तीन ते चार रात्रीसाठी तुम्हाला सुमारे 25 हजार खर्च करावे लागतील. याशिवाय कमी खर्चात तुम्ही कंबोडियाभोवती फिरू शकता. नैसर्गिक सौंदर्य, मंदिरे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखला जाणारा हा देश पर्यटकांसाठी बजेट-अनुकूल आहे.

3. थायलंड (फुकेत, ​​क्राबी)

बजेट फ्रेंडली फॉरेन डेस्टिनेशनमध्ये थायलंडचाही समावेश आहे. जिथे येऊन तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट स्ट्रीट फूड्स, बँकॉक आणि पट्टाया मधील हाय स्ट्रीट मार्केट्स, स्पा, क्लबिंग हे अनेक पर्याय आहेत जे तुमची ट्रिप अधिक आनंददायी बनवू शकतात. फुकेत थायलंडमधील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, तर क्राबी त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. जिथे एकदा जाणे आवश्यक आहे.

4. श्रीलंका

श्रीलंका हे आणखी एक सुंदर आणि पॉकेट फ्रेंडली ठिकाण आहे. हा देश आपल्या समृद्ध संस्कृती, सुंदर दृश्ये आणि सुंदर समुद्र किनारे लोकांना आकर्षित करतो. समुद्रकिनारे, पर्वत, सुंदर आणि भव्य मंदिरे, स्वादिष्ट खाणेपिणे या सर्व गोष्टी तुम्हाला श्रीलंकेत मिळतील. अतिशय कमी बजेटमध्ये तुम्ही या सुंदर देशाला एक्सप्लोअर करु शकता शोध घेऊ शकता.

5. इंडोनेशिया (बाली)

जर तुम्ही कमी बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिपची योजना आखत असाल तर तुम्ही तुमच्या यादीत बालीचा समावेश करू शकता. समुद्रकिनाऱ्याच्या काठावर वसलेल्या बालीमध्ये पारंपारिक संगीतासह सादर केलेली अनेक जुनी मंदिरे आणि नृत्ये जगभरातील लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहेत. दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक बालीला पोहोचतात. बालीमधील नाईटलाइफचा आनंद घेत असताना, उलुवाटू, उबुद, कुटा एक्सप्लोर करण्यास चुकवू नका. याशिवाय, बाली त्याच्या अप्रतिम स्वादांसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

SCROLL FOR NEXT