Clean Gmail Storage  Saam Tv
लाईफस्टाईल

Clean Gmail Storage : Gmail स्टोरेज फुल्ल झालंय? टेन्शन घेऊ नका , सोप्या ३ ट्रिक्स येतील कामाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gmail स्टोरेजच्या समस्येला जवळपास प्रत्येकजणाला सामोरे जावे लागते. अनेकदा जीमेल खात्यावरचे स्टोरेज फुल्ल झाल्याचं नोटिफिकेशन येते, अतिरिक्त स्टोरजसाठी पैसे मोजावे लागतात, किंवा जुने मेल डिलीट करावे लागतात. गुगलकडून प्रत्येकाला १५ जीबी मोफत स्टोरेज दिले. हे स्टोरेज Drive, Emails, WhatsApp Backup यासह इतर अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. १५ जीबी स्टोरेज फुल्ल झाल्यानंतर मेल येणं बंद होतं,आशात अनेकांना टेन्शन येते.पण टेन्शन येऊ नका. तुमचं जीमेल स्टोरेज कमी करण्याच्या सोप्या ट्रिक्स सांगणार आहो.

अनावश्यक ई-मेल तुम्ही दोन पद्धतीने डिलिट करु शकता. एक-एक करुन सर्व ई-मेल(email) सिलेक्ट करा आणि डिलीट करा. या प्रोसेसला खूप वेळ लागतो. पण हा सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये तुमचे महत्वाचे ईमेल डिलीट होण्याची शक्यता नसते.

काही वेळात तुम्हाला अनावश्यक ईमेल डिलीट(deleted) करायचे असतील, तर फिल्टरचा वापर करावा लागेल. त्यामध्ये तुम्ही एक क्लिक करुन सर्व ईमेल डिलीट करु शकता. त्यासाठी तुम्हाला Search in mail वर जाऊन unsubscribe अथवा Unread टाइप करावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्व unsubscribe आणि Unread ईमेलची पूर्ण यादीच येईल. त्यानंतर तुम्ही सर्व मेल एकत्र सिलेक्ट करुन डिलीट करु शकता.

Spam Email साठी फिल्टर वापरा

Spam Email डिलीट करण्यासाठी आणि शोधण्यासाठी जीमेल फिल्टर वापरावे लागेल. तुम्हाला जीमेलच्या Search in mail बॉक्समध्ये जावे लागेल आणि unsubscribe टाइप करावे लागले. त्यानंतर तुम्हाला सर्व स्पॅम मेल आणि unsubscribe मेलची यादी दिसले. सर्व स्पॅम ईमेलला सिलेक्ट करुन तीन डॉट्स (More) वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मिल्टर मेसेज(Massge) लाईक दीस पर्यायावर जावे लागेल.

त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला डिलीट करा, Mark as read आणि Skip the inbox या सारखे सर्व पर्याय दिसतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर यापुढे आशा प्रकरच्या ईमेलला जीमेल पर्यायाने तुम्ही निवडलेले फिल्टर देईल.

अनावश्यक ई-मेलला अनसब्सक्राइब करा -

जीमेलवर वारंवार येणाऱ्या आणि अनावश्यक वेबसाइट ईमेलला अनसब्सक्राइब करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्हाला त्या वेबसाईटवरुन पुन्हा कधीच ईमेल येणार नाहीत.पण ते अनसब्सक्राइब करण्यासाठी तुम्हाला स्पॅम ईमेल निवडावा लागेल. त्यानंतर रिपोर्ट स्पॅम आणि अनसब्सक्राइब(Subscribe) करा पर्यायावर जावे लागेल. त्या स्पॅमचा रिपोर्ट करावा लागले. यानंतर तुम्हाला त्या ईमेलवरून पुन्हा कधीच मेल मिळणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT