Mobile Buying Tips : नवीन फोन विकत घेताय? वेळीच व्हा सावधान! 'या' चुका पडू शकतात महागात

New Mobile : नवीन फोन खरेदी करताना असंख्य लोक घाईत निर्णय घेतात आणि चुका करतात. फोन खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचं आहे. चला तर मग नवीन फोन खरेदी घेताना कोणती काळजी घ्यावी जाणून घेऊयात.
New Mobile
Mobile Buying TipsSAAM TV
Published On

स्मार्टफोनची क्रेझ एवढी वाढली आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याच आकर्षण आहे. सकाळी उठल्याबरोबर हातात फोन पाहिजे, जेवतानासुद्धा फोन पाहिजे, आईवडील मुलगा रडायला लागला की त्याला फोन देतात. एकूण काय तर फोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झाला आहे. तसं तर फोन गरजेचा आहे. पण फोन घेताना काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याने करून तुम्हाला पुढे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

नवीन स्मार्ट फोन घेणं हा एक चांगला आणि मस्त अनुभव असतो. पण बऱ्याच वेळा आपण घाई घाईत काही चुका करतो. आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. काही गोष्टींवर लक्ष देऊन आणि काही चुका सुधारून तुम्ही बेस्ट स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यासाठीच नवीन स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक ठरेल.

किंमत वर लक्ष देऊ नका

प्रत्येक वेळी किंमत बघणे गरजेचे नाही. तर क्वालिटी, कॅमेरा, बॅटरी लाईफ, आणि प्रोसेसर कसा आहे? त्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. तसच कोणत्याही नवीन ब्रँड पेक्षा नामांकित अश्या ब्रँडकडेच लक्ष द्या. कारण नामांकित ब्रँडचा फोनमध्ये अडचणी येत नाहीत आणि सहज त्याचे सर्व्हिस सेंटर पण उपलब्ध होईल.

फीचर्स वर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका

सर्वात पहिल्यांदा फोनमध्ये असे फीचर्स बघा जे तुम्हाला गरजेचे आहेत. जास्त फीचर्सवाले फोन महाग असतात आणि कित्येक वेळा जे जास्त फीचर्सवाले फोन असतात त्याचा उपयोग आपण कधी करत नाही. आवश्यक फीचर्स असणारेच फोन निवडा. जर तुम्ही गेमिंग करत असाल तर चांगला प्रोसेसर असणारा फोनची निवड करा. जर तुम्ही फक्त सोशल मीडियाचा वापर करत असाल तर साधा प्रोसेसरवाला फोन योग्य आहे.

New Mobile
Special Report : सतत मोबाईल वाजल्याचा भास होतोय? सावधान! तुम्हालाही हा गंभीर आजार असू शकतो

ऑफर्सच्या मोहजालात पडू नका

ज्या फोनसाठी ऑफर्स असतात त्याचे नियम लक्षपूर्वक वाचले पाहिजे. काहीवेळा ठराविक बँकानाच्या कार्ड्सवरती सवलत असते.त्याबरोबरच फक्त ऑफर्स बघून फोन खरेदी करू नका तर जो गरजा पूर्ण करेल तोच फोन खरेदी करा.

विक्री करणारा सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका

कोणताही फोन खरेदी करण्याआधी ऑनलाइन लोकांची मत काय आहेत ते तपासा. तसेच आपले मित्र कोणते फोन वापरतात, कोणता फोन चांगला आहे, त्यांच्याशी बोला आणि निर्णय घ्या. सरळ दुकानात जाऊन फोन संदर्भात चौकशी करा. दुकानदार सांगतोय म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. विविध दुकाने आणि मॉल मध्ये जाऊन फोनची किंमत काढून तुलना करा. कोणता फोन योग्य आहे ते तपासून मगच फोन विकत घ्या.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

New Mobile
How Mobile Affect Our Life : तुम्ही मोबाईल वापरताय की मोबाईल वापरतोय तुम्हाला! वाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com