Ghevar Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Ghevar Recipe : लाडक्या गणरायाला बनवा 'घेवर'चा चविष्ट नैवेद्य; वाचा सिंपल रेसिपी

Ghevar Recipe in Marathi : १० दिवसांत रोज नवीन नेवैद्य काय बनवायचा असा प्रश्न पडत असतो. म्हणून आज तुमच्यासाठी एका नवीन पदार्थाची रेसिपी आणली आहे .

Ruchika Jadhav

महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वत्र लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. या १० दिवसांत बाप्पाला वेगवेगळा नैवेद्य दिला जातो.प्रत्येक सण हा एखाद्या गोड पदार्थाशिवाय अपूर्ण आहे. बाजारात मिळणाऱ्या मिठाईपेक्षा घरच्या घरी मिठाई बनवणे कधीही चांगले आहे. ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहू शकते. या १० दिवसांत रोज नवीन नेवैद्य काय बनवायचा असा प्रश्न पडत असतो. म्हणून आज तुमच्यासाठी एका नवीन पदार्थाची रेसिपी आणली आहे . तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करुन लाडक्या गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करु शकता.

घेवर बनवण्याचे साहित्य

बेसन

साजूक तूप

१/४ दूध

सुका मेवा

बर्फाचे तुकडे

१/४ पिवळा रंग

सिरपसाठी

एक कप साखर

एक कप पाणी

टॅापिंगसाठी

वेलची पावडर, केसर आणि दूध

घेवर बनवण्याची कृती

घेवर तयार करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी एक गाळणी द्या. त्यानंतर एक बाउल घेवून त्यात तूप आणि बर्फाचे तुकडे टाका. जर तूप चिकटत असेल तर त्यामध्ये बर्फाचे अजून तुकडे टाका. हे मिश्रण जो पर्यंत सफेद आणि घट्ट होत नाही, तो पर्यंत मिक्स करत राहा. त्यानंतर त्या मिक्स केलेल्या मिश्रणात दूध, बेसनाचे पीठ आणि पाणी मिक्स करुन पातळ मिश्रण तयार करु घ्या. त्यानंतर एक वाटी घेवून त्यात थोडसं पाणी टाकून पिवळा रंग मिक्स करा. हे सर्व मिश्रण एकत्र तयार करुन घ्या.

त्यानंतर गॅस ऑन करुन घ्या. त्यावर एक स्टीलचं भांड ठेवून त्यात अर्धी वाटी साजूक तूप टाका. तूप चांगलं गरम झाल्यावर हे सर्व मिश्रण एका ग्लासात भरुन घ्या . त्यानंतर हे मिश्रण एका पातळ करुन त्यात टाका. हे सर्व मिश्रण एकत्रितपणे नीट व्यवस्थित आणि जमा होऊ द्या. मिश्रण जमा होईपर्यंत आणखी एका बाजूने हे ग्लासातील मिश्रण भांड्याच्या किनाऱ्यावरुन टाका.

आपल्या या तयार झालेल्या घेवरमध्ये लहान लहान होल दिसू लागतील. घेवर भांड्याला चिकटणार नाही. घेवरची चाळणी त्यानंतर एका मोकळ्या भांड्यात ठेवा. त्यानंतर साखरेचा पाक तयार करुन त्यात घेवर बुडवून बाहेर काढून घ्या. मग घेवर थंड झाल्यावर घेवरवर सिल्वर फॅाइल पेपर लावा. त्यानंतर कापलेले ड्राय फ्रुटस, वेलची पावडर, आणि केसर सजावटीसाठी टाका. अशा पद्धतीने आपला घेवर पूर्णपणे तयार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT