Monsoon Hair Care SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Hair Care : पावसाळ्यात केस गळतीपासून सुटका हवीय? 'हे' आंबट पदार्थ खाऊन पाहा, टक्कल होईल गायब

Shreya Maskar

केस गळती ही सामान्य समस्या असली तरी पावसाळ्यात तिचे प्रमाण वाढते. यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. हवामानातील आर्द्रतेमुळे केसात ओलावा राहतो. यामुळे टाळूवर घाण जमा होऊन कोंड्याची समस्या निर्माण होते. यामुळे पावसाळ्यात आपल्या आहारात आंबट पदार्थांचा समावेश करावा. कारण आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे पावसाळ्यात तुमचे केसांचे आरोग्य चांगले ठेवते.

व्हिटॅमिन सी

शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे पावसात केस गळतीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल. व्हिटॅमिन सी मधून केसांना सर्वात जास्त पोषण मिळते. व्हिटॅमिन सी च्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेजन उत्पादन वाढवते आणि आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो. व्हिटॅमिन सी फ्री रॅडिकल्सपासून केसांचे होणारे नुकसान वाचवते.

संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे केसांची गळती थांबवून केसांची उत्तम वाढ करते. केसात कोंडा झाल्या असल्यास संत्र्याची सालं केसाला चोळावी यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. रोज एक संत्र खाल्ल्याने केस सुंदर आणि चमकदार होतात.

चिंच

चिंचेचे पाणी केस गळतीवर रामबाण उपाय आहे. चिंच केस मजबूत करण्यास मदत करते. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी फायबर हे पोषक घटक असतात. चिंचेमधील फ्लेव्होनॉइड्स आरोग्यासाठी चांगले असते.

किवी

किवीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी आणि ई मोठ्या प्रमाणात असते. यामुळे किवी चा आपल्या डाएटमध्ये सहभाग करून घ्यावा. ही व्हिटॅमिन्स केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात. ज्यामुळे केस कमी तुटतात आणि केसांची वाढ चांगली होते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. टाळूला खाज येत असल्यास किंवा पावसाळ्यात केस गळती होत असेल तर नियमित स्ट्रॉबेरीचे सेवन करावे. एका आठवड्यात तुम्हाला फरक दिसेल. केसांना चमक येऊन केसांचा पोत सुधारेल.

लिंबू

लिंबूमधील कॅल्शियम केसांची मूळ मजबूत करण्यास मदत करतात. लिंबूमुळे स्कॅल्पचे आरोग्य सुधारते. तुम्ही लिंबूची सालं केसांना लावू शकता. तसेच लिंबूमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो. केसांची मूळ मजबूत होऊन केस गळती थांबते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Rules: चुकीला माफी नाही..IPL मध्ये ही चूक केल्यास थेट 2 वर्षांचा बॅन

Crime News : कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; मुंबईमधील खळबळजनक घटना

Stress Free होण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा...

Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Viral News: असलं धाडस नको! पुराच्या पाण्यात दुचाकी टाकणं अंगलट; तरुण वाहून जातानाचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT