केसांची निगा राखण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रिटमेंट केली जाते. त्यासोबतच केसांवर अनेक रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.
केसांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी केसांना मेहंदी लावा त्यामुळे तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जात नाही आणि केस हेल्दी रहातात.
परंतु तुम्ही मेहंदी भिजवताना काही चुका केल्यास तुमचे केस ड्राय आणि डॅमेज होऊ शकतात. त्यासोबतच केस गळतीची समस्या देखील उद्भवू शक्ते. जाणून घेऊया मेहंदी भिजवण्याची योग्य पद्धतं.
केसांना मेहंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावू नये तेल लावल्यामुळे केसांवर मेहंदीचा रंग येत नाही. त्यासोबतच मेहंदी टिकून राहत नाही. मेहंदीमुळे अनेकदा केस ड्राय होतात त्यामुळे सतत केसांना मेहंदी लवू नये.
मेहंदी केसांना २ तासांपेक्षा जास्तवेळ लावल्यामुळे तुमच्या केसांना अनेक समस्या होऊ शकतात. त्यासोबतच ड्राय स्कॅल्प, कोंडा यासारख्या समस्या उद्भवतात. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी केसांवर कोमट तेलाने मसाज करून.
त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेल्या केसांवर मुळापासून मेहंदी लावण्यास सुरुवात करा. बाजारात विविधप्रकारच्या मेहंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे मेहंदी भिजवताना त्यामध्ये दही किंवा ताक मिसळा.
मेहंदीमध्ये किंवा केसांना दही लावल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो त्यासोबत केस मऊ होण्यास मदत होते. केसांवरील मेहंदी धूतांना कोमट पाण्याचा वापर करा यामुळे केस स्वच्छ धुवून निघतात. मेहंदीनंतर लगेच शॅम्पूचा वापर करू नये.
मेहंदी स्वच्छ घूतल्यानंतर केसांवर कोरफड गर लावा यामुळे केसांवर चमक येते. मेहंदी लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना तेलाने मसाज करा. यामुळे केस अधीक चमकदार आणि निरोगी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.