Jwariche Ambil Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Jwariche Ambil Recipe : गौराईचे फेवरेट ज्वारीचे आंबील; घरच्याघरी बनवा सिंपल नैवेद्य रेसिपी

Ambil Recipe : गौरी घरी आल्याने सर्वत्र नैवेद्याचे विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी गौरीला आवडणारं ज्वारीचं आंबील कसं बनवायचं याची रेसिपी सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

गौराई म्हणजे एक सुवासिनी. ही सुवासिनी 4 दिवसांसाठी आपल्या माहेरी येते. माहेरी आलेल्या प्रत्येक लेकीचे भरभरून लाड पुरवले जातात. यामध्ये गौरीच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवण्यात येतात. गौरीच्या आवडीचे अनेक पदार्थ आहेत. नैवेद्यात गौरीच्या आवडीचे सर्व पदार्थ ठेवावेच लागतात. यामध्ये गौरीचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे ज्वारीचे आंबील. काही महिलांना ज्वारीचे आंबील हवे तसे बनवता येत नाही. त्यामुळे आज याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

ज्वारीचे पीठ - 4 चमचे

दही - 5 चमचे

शेंगदाणे कूट - 2 चमचे

जिरे, मोहरी - 1 चमचा

तीळ - 2 चमचे

हिंग - चिमुटभर

मिरची - 2 ते 3 बारीक चिरलेल्या

मीठ - चवीनुसार

तेल - 2 पळ्या

पाणी - आवश्यकता असल्यास

कृती

आंबील बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या. या पिठात पाणी मिक्स करा. पाणी चांगलं एकजीव झालं की ते रात्रभर भिजत ठेवा.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर या मिश्रणात दही मिक्स करा. दही सुद्धा छान मिक्स करून घ्या. त्यानंतर गॅसवर एक भांड ठेवा, यात तेल टाकून घ्या. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या. कढीपत्ता टाकल्यावर पुढे शेंगदाणा कूट आणि तीळ मिक्स करून घ्या.

तसेच पुढे यामध्ये मिरची आणि मीठ टाकून घ्या. सर्व मिश्रण एकजीव करताना यात आवशकतेनुसार पाणी मिक्स करा. पाणी टाकल्यावर याला छान एक उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यावर त्यात ज्वारी आणि दह्याचे तयार मिश्रण टाकून घ्या. हे मिश्रण टाकताना एका हाताने ते छान ढवळून घ्या.

मिश्रण छान शिजवून घ्या. सर्व मस्त शिजले की तयार झाले तुमचे चविष्ट ज्वारीचे आंबील. तुम्हाला पांढरी आंबील बनवायची असेल तर त्यासाठी फक्त दूध, सारख, मीठ आणि पाणी फक्त याचीच गरज असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT