Garlic Benefits | Lasun Khanyche Fayde | Health Benefits of Eating Garlic (Lasun) Saam Tv
लाईफस्टाईल

Garlic Benefits: सकाळी उठल्याबरोबर खा लसणाची पाकळी, साखरेची पातळी राहिल नियंत्रणात; अनेक आजार पळतील दूर

Lasun Khanyche Fayde | नियमितपणे रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. लसणात अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत.

कोमल दामुद्रे

Garlic Benefits For Health:

लसणांमुळे पदार्थाला चव येते हे जितके खरे आहे तितकेच तो आरोग्यासाठी देखील बहुगुणी आहे. स्वयंपाकघरातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी लसणाचा हमखास वापर केला जातो. लसणाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

नियमितपणे रिकाम्या पोटी लसणाचे (Garlic) सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. लसणात अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत. ज्यामुळे अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होते. लसणात फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम,कार्बोहायड्रेट्स, झिंक, कॉपर, रिबोफ्लेविन, थायामिन, नियासिन सारखे पोषक घटक आढळतात. जाणून घेऊया रोज सकाळी उठल्याबरोबर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीराला कसे फायदे (Benefits) होतात.

1. पचनसंस्था सुधारते

लसणात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. या कारणामुळे पोटाशी (Stomach) संबंधित अनेक समस्या दूर होतात.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

लसणात नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहेत. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

3. हृदयाचे आरोग्य सुधारते

लसणात असलेले अॅलिसिन आणि सल्फर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

4. रक्तातील साखरेचे नियंत्रण

नियमितपणे लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. तसेच मधुमेहाचा धोका टळतो.

5. त्वचा निरोगी ठेवण्यास मदत

लसणात असलेले पोषक तत्व त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ कमी होतात. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील लसूण फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT