लाईफस्टाईल

Vande Bharat Express (Mumbai To Ratnagiri) : कोकणात गणपतीक जाऊचा असा! 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने पोहोचा अगदी कमी रुपयांत; तिकीट कसे बुक कराल?

Vande Bharat Express : गणपती म्हटलं की, प्रत्येक कोंकणी माणूस गावी गेल्याशिवाय राहात नाही. गणपती येण्यापूर्वी आपण ट्रेनचे तिकीट बुक करतो.

कोमल दामुद्रे

Ganpati special train 2023 :

येवा कोंकण आपलोच आसा..., अवघ्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. गणपती म्हटलं की, प्रत्येक कोंकणी माणूस गावी गेल्याशिवाय राहात नाही. गणपती येण्यापूर्वी आपण ट्रेनचे तिकीट बुक करतो.

नुकतीच कोकणात मुंबईहून जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध केला गेला. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे गोव्यासोबतच कोकणात जाण्याचा प्रवास अधिक सुकर झाला आहे. ही ट्रेन तेजस एक्स्प्रेसच्या तुलनेत एक तासाआधी पोहोचवेल. परंतु, तुम्हालाही मुंबईहून कोकणात जायचे असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सोयीस्कर ठरु शकतो. तिकीट कसे बुक कराल? तिकीट दर किती? एक्स्प्रेसचा टाइम किती जाणून घेऊया

1. वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ

वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी ५.३५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ही ट्रेन ठाण्यात (Thane) ६.०५ मिनिटांनी थांबेल, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १० वाजता थांबेल. साधारणत: ८ तासात ही ट्रेन (Train) आपल्याला कोकणात पोहोचवेल.

2. वंदे भारत एक्स्प्रेसचा तिकीट दर किती?

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन एसी कोच-१८१५ रुपये तर इसी कोच ३३६० रुपये प्रति

  • दादरवरुन एसी कोच-१८१० रुपये तर इसी कोच ३३३५ रुपये प्रति

  • ठाण्यावरुन एसी कोच-१७१० रुपये तर इसी कोच ३२९० रुपये प्रति

  • पनवेलवरुन एसी कोच-१७३५ रुपये तर इसी कोच ३१८५ रुपये प्रति

  • खेडवरुन एसी कोच-१४०५ रुपये तर इसी कोच २५१० रुपये प्रति

  • रत्नागिरीवरुन कणकवली एसी कोच-१०५५ रुपये तर इसी कोच १८८० रुपये प्रति आहे.

3. तिकीट कसे बुक कराल?

  • प्रवासी बुकिंग करताना भारतीय रेल्वे स्थानके आणि काउंटरद्वारे किंवा IRCTC वेब पोर्टल आणि Rail Connect अॅपद्वारे तिकीट बुक करू शकतात.

  • irctc.co.in वर IRCTC ई-तिकीटिंग वेबसाइटवर जा आणि लॉग इन करा.

  • नंतर 'तुमचे तिकीट बुक करा' त्यानंतर कुठे जायचे आहे याची माहिती फिल करा

  • कधी जायचे आहे त्याची तारीख निवडा.

  • प्रवास करताना सीटचा प्रकार AC चेअर कार किंवा एक्झिक्युटिव्ह निवडा.

  • प्रवाशांचे तपशील भरा आणि शेवटी, पेमेंट करा. तिकीट बुक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

Celebrity Mangalsutra Designs: सेलिब्रिटींना घातलेली 5 युनिक मंगळसूत्र, या आहेत ट्रेडिंगच्या डिझाईन्स

Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

Copper Vs Glass Bottle Health: तांब्याच्या की काचेच्या बाटलीतील पाणी चांगलं? तुमच्या-आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT