Ganpati Festival Recipe
Ganpati Festival Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Ganpati Festival Recipe : गणरायाला सर्वात प्रिय असा पंचकजाया, झटपट बनेल !

कोमल दामुद्रे

Ganpati Festival Recipe : सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. सर्वत्र भक्तीमय असे वातावरण झाले असून गणेशाचा जयजयकार सुरु आहे. या काळात गणपतीची मनोभावे पूजा केली जाते व त्याची कृपादृष्टी आपल्या सर्वांना राहू देत अशी प्रार्थना केली जाते.

गणपतीला मोदक- लाडू व गोडाचा नैवेद्य ठेवला जातो पण त्याच बरोबर गणेशाला पंचकजायाचा देखील प्रसाद ठेवला जातो. पंचा हा संस्कृत शब्द आहे. पंचकजाया हा सगळ्या टेस्टी व पाच पदार्थांपासून बनवलेला पदार्थ आहे.

पंचकजाया हा पदार्थ विशेषत: गणपतीच्या काळात बनवला जातो व असे मानले जाते हा गणपतीचा सर्वात प्रिय असा पदार्थ आहे. त्याला गोड पोहे किंवा पंचकजाया म्हणून ओळखले जाते. जाणून घेऊया त्याची रेसिपी.

साहित्य -

काजूचे तुकडे - १/२ वाटी

बदामाचे काप - १/२ वाटी

मणुके - १/२ वाटी

किसलेले ओले खोबरे - १ वाटी

गुळ - १ वाटी

पोहे - २ वाटी

तूप - २ ते ३ चमचे

वेलची पूड

कृती -

१. सर्वप्रथम पोहे चाळून घ्या. त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात गूळ व अर्धा कप पाणी (Water) घाला. मंद आचेवर उकळून द्या.

२. दुसरीकडे पॅन ठेवून त्यात १/२ चमचा तूप घालून मंद आचेवर खोबरे (Coconut) भाजून घ्या व ते थंड होण्यास ठेवा.

३. पुन्हा पॅनमध्ये तूप घालून बदाम, काजू व मणुके परतवून घ्या. हे ड्रायफ्रुट्स भाजलेल्या खोबऱ्यात घाला. तयार झालेले गुळाचे पाक गाळून घ्या.

४. गुळाच्या पाकाला पुन्हा गॅसवर घेऊन त्यात वेलची पूड घाला व चांगले मिक्स करा. १ मिनिट उकळवून घ्या. त्याचे एकतारी पाक तयार झाल्यानंतर गॅसवरून खाली उतरवा व थंड होण्यास ठेवा.

५. गुळाचे पाणी कोमट झाल्यानंतर त्यात पोहे, खोबरे व ड्रायफ्रुट्सचे मिश्रण घालून चांगले एकजीव करा व प्रसादात ठेवा पंचकजाया.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Effects of Green Tea : डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Ghatkopar News: होर्डिंग्ज मालकासह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दानवेंची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मागणी

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच

Tips to Increase Memories: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे नवे प्रयोग करून बघा!

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यूंचा आकडा १७ वर

SCROLL FOR NEXT