World Coconut Day 2022 : यंदाचा 'कोकोनट डे' बनवा खास, गणोबाला नैवेद्यात ठेवा 'हे' नारळाचे झटपट पदार्थ

गणपतीच्या एका बाजूला केळीचा ढिग तर दुसऱ्या बाजूला नारळाचा ढिग लागलेला असतो. इतक्या साऱ्या नारळाचे नेमके काय करायचे हा प्रश्न पडतो.
World Coconut Day 2022, Ganesh Chaturthi
World Coconut Day 2022, Ganesh Chaturthi Saam Tv
Published On

World Coconut Day 2022 : २ सप्टेंबरला 'जागतिक नारळ दिन' हा दिवस प्रामुख्याने आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. कारण या प्रदेशांमध्ये जगातील सर्वात जास्त नारळ उत्पादन केंद्रे आहेत. यावर्षी आपण जागतिक नारळ दिनाची ५२ वी जयंती साजरी करणार आहोत.

नारळाची सार्वत्रिक उपयोगिता पाहता, जागतिक नारळ दिन साजरा करणे हे त्याचे उत्पादन, महत्त्व सर्वसामान्यांसाठी सुलभ बनवण्याच्या उद्देशाने आणि त्याबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून नारळाचा कच्चा माल निर्यात करून, जगभर उत्पादन केले जाऊ शकते नारळ लागवड आणि उद्योगातून चांगला रोजगार मिळू शकतो.

World Coconut Day 2022, Ganesh Chaturthi
World Coconut Day 2022 : धार्मिक कार्यासोबतच आरोग्यातदेखील आहे नारळाचे अधिक महत्त्व

सध्या घरोघरी गणपती विराजमान आहेत आणि योगायोगाने आज कोकोनट डे सुध्दा. सध्या बाप्पाच्या दर्शनाला येणारे पाहुणे मंडळी नारळ, पेढे-मोदक घेऊनच येतात. गणपतीच्या एका बाजूला केळीचा ढिग तर दुसऱ्या बाजूला नारळाचा ढिग लागलेला असतो. इतक्या साऱ्या नारळाचे नेमके काय करायचे हा प्रश्न पडतो. अशावेळी घाबरून जाऊ नका त्याचा उपयोग कशा पध्दतीने कराल हे पाहूया.

नारळी भात -

Coconut Rice
Coconut RiceCanva

१. नारळी भात (Rice) बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकतो, परंतु बासमती तांदूळ यासाठी चांगले असतात. त्याच्या सुवासामुळे त्याची चव आणखी वाढते

२. तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा. हरभरा डाळ आणि उडीद डाळ अर्धा चमचा पाण्यात भिजवून घेणे.

३. आता भात शिजवून घ्या. एका पॅनमध्ये टेम्परिंग तयार करा.

४. टेम्परिंगसाठी मोहरी आणि दोन्ही डाळी खोबरेल तेलात शिजवा. २ चमचे काजू घाला व ते सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

५. आता कढीपत्ता, लाल मिरची व हिंग घालून शिजवून घ्या. वरून त्यात खिसलेले खोबरे घाला.

६. शेवटी तांदूळ मिक्स करून चवीनुसार मीठ घालून गॅसवरून उतरवा व नैवेद्याच्या थाळीत नारळी भात सर्व्ह करा.

नारळाची चटणी

Coconut Chutney
Coconut ChutneyCanva

१. खोबरे बारीक चिरून मिक्सरमध्ये घाला. त्यात भाजलेली हरभरा डाळ, हिरवी मिरची, आले, लसूण आणि पाणी घालून बारीक करून घ्या. चवीनुसार मीठ घालावे.

२. तेलात मोहरी, उडीद डाळ, जिरे, लाल मिरची आणि कढीपत्ता शिजवून ते नारळाच्या प्युरीमध्ये मिसळा. नारळाची चटणी तयार आहे.

भेंडी-नारळाची भजी

okra coconut bhaji
okra coconut bhajiCanva

१. भेंडी सामान्य आकारात कापून घ्या. गॅसवर तवा ठेवून तेल गरम करुन त्यात कांदे भाजून घ्या. कांदे शिजल्यावर त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो घाला.

२. धणेपूड, तिखट, हळद, मीठ, हिंग आणि आमचूर पावडर घाला. तयार भेंडीच्या भाजीमध्ये खोबरे घाला व बेसनाचे पीठ घालून भजी तळून घ्या.

नारळाची बर्फी

Coconut Barfi
Coconut BarfiCanva

१. एक कढई घेऊन त्यात एक चमचा तूप घाला. त्यात चिरलेले काजू घालून तळून घ्या. यानंतर किसलेले खोबरे आणि दूध घालून शिजवा.

२. सतत चमचा ढवळत राहून १५ मिनिटे शिजवून घ्या. वरुन दीड वाटी साखर घालून पुन्हा मंद आचेवर शिजवून घ्या. वेलची पूड घाला.

६. आता नारळ बर्फी सेट करण्यासाठी ठेवा आणि इच्छित आकारात कापून घ्या.

भोपळा - नारळाची करी

Pumpkin-coconut curry
Pumpkin-coconut curryCanva

१. कुकर मंद आचेवर ठेवून त्यात तेल घालून मेथीदाणे फोडणी करावी.

२. आता हिरवी मिरची घाला.

३. चिरलेला भोपळा घाला आणि चवीनुसार मीठ आणि धणेपूड, लाल तिखट, हळद आणि किसलेले खोबरे घालून शिजवा.

४. चविष्ट नारळ (Coconut) आणि भोपळ्याची करी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com