Ganeshotsav 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2024 : भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरे; गणेशोत्सवातील शोभा पाहून जाल भारावून

Ganeshotsav Famous 5 Temples : या गणेशोत्सवात भारतातील ५ प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट द्या. भारतातील ही प्रसिद्ध मंदिरे नवसाच्या गणपतींची आहेत.

Ruchika Jadhav

गणपती बाप्पा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं लाडकं दैवत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मनोभावे गणरायाची सेवा करतात. तुम्ही सुद्धा गणेशोत्सवात गणपतीची सेवा करत असाल. अशात यंदाच्या गणेशोत्सवात भारतातील काही प्रसिद्ध आणि सुंदर मंदिरांची यादी पाहणार आहोत.

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईमधील दादर येथे श्री सिद्धिविनायकाचे सुंदर मंदिर आहे. लाखो गणेश भक्तांचं हे एक श्रद्धास्थान आहे. सामान्य नागरिकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर १८ व्या शतकात १८०१ मध्ये बांधण्यात आलं आहे. मंदिरातील सर्वाधित श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर असल्याचं मानलं जातं.

पुणे - दगडूशेठ हलवाई गणपती

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला शतकांहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे. येथील बाप्पाची मूर्ती ७.५ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहे. इतकेच नाही तर ही मूर्ती ८ किलो सोन्याने सुद्धा सजली आहे.

इतिहास काय?

प्रसिद्ध मिठाई विक्रेते आणि श्रीमंत व्यापारी दगडूशेठ गडवे यांच्या मुलाचे १८०० च्या उत्तरार्धात प्लेगच्या साथीत निधन झाले. मुलगा गेल्याने त्यांची पत्नी सुद्धा नैराश्यात गेली. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराज यांनी त्यांना गणेश मंदिर बांधण्यास सांगितलं होतं.

बुंगळुरू - डोडा गणपती

बंगळुरू शहरापासून सुमारे १३ किमी अंतरावर बसवनगुडी परिसर आहे. येथेच डोडा गणपतीचं भव्य मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ५०० वर्षांपूर्वी बांधल्याचं मानलं जातं. डोडा या शब्दांचा मराठी अर्थ म्हणजे. नावाप्रमाणेच येथील बाप्पाची मूर्ती आहे. ही मूर्ती तब्बल १८ फूट उंच आणि १६ फूट रुंद आहे. विशेष म्हणजे मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या खडकावर कोरलेली आहे.

कर्नाटक - विनायक देवरू मंदिर

कर्नाटकमध्ये तब्बल १५०० वर्षे जुनं श्री विनायक देवरू मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती गोकर्ण मंदिरातील मूर्तीशी जुळतीमिळती आहे. ही मूर्ती अतिशय आकर्षक आहे. मूर्तीमध्ये बाप्पाच्या एका हातात कमळाचे फूल आणि दुसऱ्या हातात मोदक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT