Jyeshta Gauri Pujan Saam Tv
लाईफस्टाईल

Jyeshta Gauri Pujan : लाडक्या गौराईचा पाहुणचार! प्रत्येक शहरात वेगवेगळ्या प्रथा आणि नैवेद्याची परंपरा

Ganesh Festival 2023 : गैराईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवद्य बनवले जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganeshotsav 2023

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक गणपतीची अत्यंत मनोभावे पूजा करतात. गणपतीपाठोपाठ गौराईंचेही आगमन झाले आहे. गौराईंचे माहेरवासिण म्हणून घरोघरी आगमन होते. तिचे लाड पूरवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे नैवद्य बनवले जातात.

महाराष्ट्रात प्रत्येक काही किलोमीटरनंतर परंपरा बदलत असते. त्याचप्रमाणे गौराईच्या पूजेची पद्धतही बदलली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवला जातो.

महाराष्ट्रात काही ठिकाणी नैवद्यात माठ किंवा भेंडीची मिक्स भाजी बनवतात. अंबाड्याची भाजी किंवा १६ वेगवेगळ्या भाज्यांची मिक्स भाजी किंवा १६ वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. याचसोबत १६ चटण्या, १६ कोशिंबीरीचा नैवद्य दाखवला जातो.

पावसाळ्यात येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांचे नैवद्य गौरीला दाखवले जातात. पावसाळ्यात दूधी भोपळ्याच्या आकाराच्या काकडीसारखी भाजी असते. याला 'बालम काकडी' असे म्हणतात. या काकडीपासून अनेक गोड पदार्थ गौराईसाठी बनवले जातात. तर नैवद्य म्हणून प्रसादही दाखवला जातात.

गौरीला सर्वात आधी नैवद्यात पंचामृत दाखवले जातात. पंचामृतात दही, दूध, तूप, मध आणि साखर हे पदार्थ एकत्रित केले जातात. गौराईचा नैवद्य काही ठिकाणी केळीच्या पानात तर काही ठिकाणी ताटात दाखवला जातो. केळीच्या पानावर जेवणे हे आरोग्यासाठी चांगले असते. हे यामागचे वैज्ञानिक कारण आहे.

गौरीच्या नैवद्यासाठी कोकणामध्ये मासांहारी पदार्थ दाखवले जातात. चिकन, मटण, कोंबडीवडे असे अनेक पदार्थ गौराईला दाखवले जातात. हे पदार्थ दाखवण्यामागे एक पौराणिक कथा आहे. हे पदार्थ गौराईसाठी नव्हे तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना दाखवले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT